Krushi Yojana: सरकारच्या ‘या’ योजनांचा लाभ घ्या आणि शेतीमध्ये करा मोठ्या प्रमाणावर विकास, वाचा योजनांची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi Yojana:- कृषी क्षेत्रासाठी सरकारच्या अनेकविध योजना असून या योजनांच्या माध्यमातून शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनात बदल व्हावा आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या दृष्टिकोनातून विविध गोष्टींकरिता अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते. शेतामध्ये सिंचनाच्या सुविधा असो की यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहन देण्याकरिता अशा अनेक प्रकारच्या योजना या राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात. या लेखामध्ये आपण शेतकऱ्यांना फायद्याच्या ठरणाऱ्या काही सरकारी योजनांची माहिती घेणार आहोत.

 शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवण्याची क्षमता असलेल्या सरकारी योजना

1- राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत मिळेल शेततळ्यासाठी आर्थिक मदत राष्ट्रीय कृषी विकास योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेती पिकांना संरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता विविध आकारमानाचे शेततळ्यांचे अस्तरीकरणासाठी कमीत कमी 15 बाय 15 बाय 15 मीटर आकाराचे शेततळ्याकरिता या योजनेच्या माध्यमातून 28 हजार 275 रुपये व जास्तीत जास्त 30 बाय 30 बाय 30 मीटर आकाराच्या शेततळ्याकरिता 75 हजार रुपये रकमेच्या मर्यादेमध्ये अनुदान देण्यात येते.

अशा पद्धतीनेच अनुदान हे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून देखील दिले जाते. यामध्ये विविध आकारमानाच्या शेततळ्यांचा विचार केला तर यापैकी कोणत्याही प्रकारच्या एका आकारमानाच्या शेततळ्यासाठी  जर तुम्हाला अनुदानाची मागणी करायचा असेल तर त्याकरिताचा अर्ज हा शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध असून त्या माध्यमातून तुम्हाला करता येतो.

या योजनेच्या माध्यमातून कमाल 34 बाय 4 बाय 3 मीटर आणि किमान पंधरा बाय पंधरा बाय तीन मीटर आकारमानाचे इनलेट आऊटलेटसह किंवा इनलेट आउटलेट नसलेले शेततळे देखील तुम्हाला करता येणार आहे. योजनेच्या माध्यमातून शेततळ्याकरिता आकारमानानुसार जास्तीत जास्त 75 हजार इतकी रक्कम अनुदान स्वरूपात मिळते.

2- मनरेगा योजना मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना देखील एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकरिता अनुदान देण्यात येते. एवढेच नाही तर गांडूळ खत युनिट तसेच नाडेप कंपोस्ट युनिट  व बांबू लागवडीला प्रोत्साहन मिळावे याकरिता देखील अनुदानाचा लाभ मनरेगा अंतर्गत दिला जातो.

या योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता इतर योजनांमध्ये अनुदाना करिता पात्र ठरत नाही अशा सर्व शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून किमान 0.20 हेक्टर ते जास्तीत जास्त सहा हेक्टर क्षेत्र असणारे शेतकरी यासाठी पात्र ठरतात.

या योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारची फळ पिके तसेच आंबा कलमे व रोपे, पेरूची कलमे व सघन लागवड व डाळिंब कलमे, कागदी लिंबू, नारळ, सिताफळ तसेच आवळा, चिंच, जांभूळ, अंजीर, चिकू, संत्रा आणि मोसंबी इत्यादी पिकांच्या लागवडीकरिता या योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या अंतरावर जर लागवड केली तर शेतकऱ्यांना अनुदान देय आहे.

3- कृषी यंत्रांसाठी अनुदान शेतकऱ्यांना शेतीमध्ये यंत्र वापरण्याला प्रोत्साहन मिळावी याकरिता विविध यंत्रांवर कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर तसेच पावर टिलर आणि ट्रॅक्टर चलित अवजारे, ठिबक आणि तुषार संच, शेडनेट तसेच पॉलिहाऊस, कांद्याची चाळ, प्लास्टिक मल्चिंग पेपर इत्यादी बाबींकरिता या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

4- पंतप्रधान पिक विमा योजना ही योजना शासनाने सुरू केली असून खूप महत्त्वाची अशी योजना आहे. या योजनेमध्ये या वर्षापासून काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले असून या बदलानुसार शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून या योजनेत नाव नोंदवता येणे शक्य होणार आहे. उर्वरित रक्कम

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भरली जाणार आहे. याकरिता शेतकऱ्यांना आधार कार्ड तसेच सातबारा उतारा, बँक पासबुकची झेरॉक्स तसेच पीक पेरणीचे स्व घोषणापत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात. या योजनेकरिता आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन नाव नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना नियमानुसार लाभ मिळणार आहे.

5- आणखी काही महत्त्वाच्या योजना या योजना व्यतिरिक्त बऱ्याच योजना आहेत जसे की गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुग्रह अनुदान योजना, हवामान आधारित फळ पिक विमा योजना, सर्वसमावेशक पिक विमा योजना, पीएम किसान योजना, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान इत्यादी योजना तसेच पिकांची प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे, मोटार पाईप इत्यादी करिता अनुदानाच्या अनेक योजना कृषी विभागाच्या माध्यमातून राबवले जातात.

अधिक माहिती करिता या ठिकाणी साधावा संपर्क

शेतकरी बंधूंना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल व त्याबाबत अधिक माहिती हवी असेल तर तुमच्या स्थानिक पातळीवरील कृषी सहाय्यक तसेच कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी संपर्क साधने गरजेचे आहे.