Lumpy Skin Disease : अरे बापरे…! कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात लंपी आजारामुळे 1,000 पशुधन मृत्युमुखी

Lumpy Skin Disease : पशुधनावर आलेल्या लंपी या आजारामुळे राज्यातील पशुपालकांवर मोठे संकट आलं आहे. विशेष म्हणजे या आजाराचा प्रादुर्भाव अजूनही पूर्णपणे थांबलेला नसल्याचे चित्र आहे. अशातच, अशी एक आकडेवारी समोर आली आहे ज्यामुळे प्रशासनाच्या उपायोजना कुचकामी ठरत असल्याचे समजत आहे. खरं पाहता, लंपी आजाराचा प्रादुर्भाव संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे.

मात्र, या आजाराचा सर्वाधिक प्रादुर्भाव मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजेच राज्यातील वर्तमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याच जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव सर्वाधिक असल्याने शासनाच्या उपाययोजनांवर या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. हाती आलेल्या एका नवीनतम आकडेवारीनुसार, सत्तार यांच्या जिल्ह्यात गेल्या साडेतीन महिन्यात 1 हजार 11 पशुधन या आजाराने मृत्युमुखी पडले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

याहून कहर म्हणजे यापैकी 241 पशुधन हे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात म्हणजेच सिल्लोड मधील आहेत. म्हणजेच, कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघातच लंपी या आजारामुळे पशुधन मोठ्या प्रमाणात दगावल्याचे चित्र आहे. खरं पाहता फक्त औरंगाबाद जिल्ह्यात या आजाराने थैमान घातलं असं नाही तर संपूर्ण राज्यात या आजारामुळे पशुपालक चिंताग्रस्त होते.

यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने लसीकरणावर जोर देण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातही लसीकरण युद्ध पातळीवर झाली. शिवाय बाधित जनावरांना उपचाराने बरे करण्यासाठी देखील शासनाने कंबर कसली आणि बहुतांशी जनावरे आजारापासून वाचवली. मात्र असे असले तरी आजाराचा प्रादुर्भाव अधिक असल्याने प्रशासनाला कुठे ना कुठे अपयश आल्याचे देखील पशुपालकांकडून वारंवार नमूद केले जात आहे.

दरम्यान, हाती आलेल्या आकडेवारीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात 2036 जनावरे बाधित झाल्या असून यापैकी 241 जनावरांचा मृत्यू झाला आहे. फुलंब्री मध्ये 1296 जनावरे या आजाराने बाधित झाले यापैकी 157 पशुधन मरण पावले. औरंगाबाद तालुक्यात 1738 जनावरे या आजाराने बाधित झाली आणि यापैकी 153 जनावरे दगावलेत. सोयगाव तालुक्यात या आजाराने 1237 जनावरे बाधित झालेत आणि 101 जनावरे दगावलीत.

पैठण तालुक्यात 1031 जनावरे बाधित झाले यापैकी 69 जनावरे दगावलीत. गंगापूरमध्ये 488 जनावरे बाधित झाले आणि 40 मृत्युमुखी पडलेत. कन्नड तालुक्यात 1566 जनावरे या आजाराने बाधित झाली यापैकी 169 जनावरे दगावलेत. खुलताबादमध्ये 755 जनावरे बाधित झाली आणि 52 जनावरे मृत्यूमुखी पडली. वैजापूर मध्ये 396 जनावरे बाधित झाली आणि यापैकी 29 जनावरे मृत्युमुखी पडली. निश्चितच औरंगाबाद जिल्ह्याची ही आकडेवारी प्रशासनाच्या योजनावर कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे.