महाडिबीटी पोर्टल शेतकऱ्यांसाठी अभिशाप ! 50 लाख शेतकऱ्यांना बसला याचा फटका, निवड होऊन देखील अनुदान मिळाले नाही ; वाचा काय आहे नेमका माजरा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahadbt Portal : शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाकडून वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना कार्यान्वित केल्या जातात. या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून बळीराजांना आर्थिक सुबत्ता प्राप्त व्हावी, त्यांना शेती करताना सोयीचे व्हावे या अनुषंगाने अनुदानाचे प्रावधान केलेले असते.

राज्यात यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी तसेच अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रांचा शेतीमध्ये फायदा व्हावा या अनुषंगाने यांत्रिकीकरण योजना राबवली जात आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यंत्र खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. निश्चितच शासनाकडून सुरू करण्यात आलेली ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारी आहे. मात्र याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी अर्जाची प्रोसेस आणि अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया यावर आता मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

खरं पाहता यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत यंत्र खरेदीसाठी अनुदान मिळवणे हेतू शेतकरी बांधवांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून वारंवार केले जाते. महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जाते आणि मग निवड झालेल्या शेतकऱ्यांना आवश्यक ते कागदपत्रे सादर करण्यासाठी ठराविक कालावधी दिला जातो.

मात्र आता महाडीबीटी पोर्टल नखरे दाखवत असून वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे जे शेतकरी बांधव लॉटरी पद्धतीने यंत्राच्या अनुदानासाठी निवडले गेले आहेत ते आपोआप बाद होत आहेत. यामुळे राज्यातील जवळपास 50 लाख शेतकऱ्यांना फटका बसला असल्याची धक्केदायक आकडेवारी समोर आली आहे.

यामुळे महाडीबीटी पोर्टल शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आले खरं मात्र हे पोर्टल शेतकऱ्यांसाठी अभिषेक बनला आहे. यामुळे एका खिडकीतच सर्व कामे होत असली तरी देखील त्यां एका खिडकीला आता हे अशक्य होत आहे.

महाडीबीटी पोर्टल मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनुदानासाठी पात्र ठरून देखील शेतकरी अनुदानापासून वंचित राहत आहेत. एकंदरीत महाडीबीटी पोर्टलच्या या विळख्यात शेतकरी राजा पुन्हा एकदा भरडला गेला आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, ट्रॅक्टर, ड्रिप, स्प्रिंकलर, शेडनेट, ग्रीन हाउस यांसह विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर ५० लाख अर्ज दाखल झाले आहेत. या वेगवेगळ्या यंत्रांसाठी शेतकरी बांधवांना 40 टक्क्यांपर्यंतचा अनुदान मिळत असतं.

त्यांमध्ये सर्वाधिक १५ लाख अर्ज ट्रॅक्टरसाठी आले आहेत. त्यापाठोपाठ ड्रिपसाठी १५ लाख अर्ज आहेत. याशिवाय हॉर्टिकल्चर करण्यासाठी साडेआठ लाख शेतकरी तयार आहेत. याशिवाय खते, बियाणे यांच्या अनुदानित मागणीसाठी १० लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. निश्चितच एवढ्या शेतकरी बांधवांना महाडीबीटी पोर्टलचा फटका बसला आहे.

विशेष म्हणजे जे शेतकरी बांधव निवड झालेले असतात त्यांनी जर ठराविक वेळेत दस्तऐवज सादर केले नाही तर ते त्यां योजनेसाठी प्रतीक्षा यादीत टाकले जातात ते पण अगदी तळाला. यामुळे या पोर्टलमध्ये सुधारणा करून काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या दूर केल्या पाहिजेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.