Maharashtra Breaking : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘या’ शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश ; वाचा सविस्तर

Maharashtra Breaking : पिक विमा नुकसान भरपाईबाबत एक अतिशय दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता, यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशा परिस्थितीत पिक विमा कंपन्यांनी लवकरात लवकर संबंधित पिक विमा धारक शेतकरी बांधवांना पिक विम्याची रक्कम वर्ग करणे बंधनकारक होते. मात्र, पिक विमा कंपन्या शेतकरी बांधवांना पिक विमा देण्यासाठी दंगल मंगल करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान पिक विमा मिळणेबाबत शेतकरी बांधवांनी तसेच शेतकरी संघटनांनी मागणी अधिक तीव्र केली.

परिणामी महाराष्ट्र कृषी विभागाने पिक विमा धारक शेतकरी बांधवांना ताबडतोब पिक विमा नुकसान भरपाई जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या शेतकरी बांधवांना अद्याप पिक विमा नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा शेतकरी बांधवांना पिक विमा नुकसान भरपाई वर्ग केली जाणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की १६४४ कोटी रुपयांची भरपाई रक्कम 30 लाख 37 हजार 539 राहिलेल्या शेतकऱ्यांना आता लवकरच देऊ केली जाणार आहे.

Advertisement

यासाठी कृषी विभागाकडून संबंधित पिक विमा कंपन्यांना आदेशित करण्यात आले आहे. पिक विमाधारक आणि नुकसानग्रस्त कोणताच शेतकरी बांधव पिक विमा पासून वंचित राहता कामा नये अशी ताकीत देखील यावेळी कृषी विभागाकडून पिक विमा कंपन्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्या शेतकरी बांधवांना पिक विमा मिळालेला नाही अशा शेतकरी बांधवांना लवकरच पिक विमा मिळणार असल्याचे चित्र आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खरीप हंगामासाठी महाराष्ट्रातील 16 लाख 86 हजार 786 शेतकरी बांधवांना पीक विमा नुकसान भरपाई देऊ करण्यात आली आहे. एवढ्या शेतकऱ्यांना 625 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. मात्र अजूनही राज्यात 30 लाख 37 हजार 539 शेतकरी बांधव पिक विमा पासून वंचित आहेत.

या शेतकरी बांधवांना जवळपास 1 हजार 644 कोटी रुपयांची नुकसान भरपाई पिक विमा कंपन्यांकडून आता मिळणार आहे. बुधवारी झालेल्या मंत्रालयातील एका आढावा बैठकीत पिक विमा कंपन्यांचे प्रतिनिधींना याबाबत आदेशित करण्यात आले आहे.

Advertisement

ऑनलाइन-ऑफलाईन ज्या पद्धतीने शेतकरी बांधवांनी पिकविण्यासाठी क्लेम केला असेल त्यांचा क्लेम मंजूर करावा. दुबार क्लेम झाला असेल तर एक क्लेम ग्राह्य धरावा असे आवाहन यावेळी मंत्रालय आढावा बैठकीत पिक विमा कंपन्यांना करण्यात आले आहे.