धक्कादायक ! महाराष्ट्राच्या 37 लाख शेतकऱ्यांचं रेशन थांबलं ; नेमकं कारण काय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Breaking : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली आहे तर बहुकष्टाने उत्पादीत केलेल्या शेतीमालाला देखील कवडीमोल दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अतिशय नगण्य असं उत्पन्न प्राप्त झालं आहे. दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बाबतीत एक धक्कादायक माहिती अहवाल समोर आला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील जवळपास 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशन भेटत नाहीय. एका आकडेवारीनुसार राज्यातील 37 लाख शेतकऱ्यांचं रेशन थांबवण्यात आल आहे. निश्चितचं निसर्गाच्या लहरीपणामुळे बेजार झालेला बळीराजासाठी ही एक चिंताजनक बाब आहे.

यामुळे शेतकरी राजा अजूनच मोठ्या आर्थिक कोंडीत सापडला आहे. या मुळे कोरडवाहू शेतकऱ्यांचीं माती होत आहे. अशा परीस्थितीत शेतकरी बांधवांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, देशातील जनतेच्या भल्यासाठी शासन कायमच वेगवेगळ्या योजना आणत असते.

केंद्र सरकारने देखील 2013 मध्ये संपूर्ण देशातील जनतेला किमान पोटभर अन्न मिळावे या अनुषंगाने अन्न सुरक्षा कायदा अमलात आणला. या कायद्याच्या माध्यमातून अत्योंदय अन्न योजना आणि एपीएल शेतकरी गटाला दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ वितरित करण्यात येतात.

ही योजना देशात 2013 मध्ये सुरु झाली मात्र राज्यात प्रत्येक्षात 2015 मध्ये याची अंमलबाजवणी सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत एपीएल गटातील शेतकऱ्यांना 5 किलो प्रति व्यक्ति धान्य मिळत होत. परंतु आता हळूहळू या गटातील शेतकऱ्यांना धान्य वितरित करणं थांबवलं जात आहे.

आता जुलै महिन्यापासून या शेतकऱ्यांना गहू मिळाला नाहीय आणि सप्टेंबर पासून तांदूळ देण्यात आलेला नाही. एकंदरीत आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे बळीराजा पुरता कोलमडला आहे.