विविध पिकांचे चांगले दर्जेदार आणि उत्पादनक्षम वाण विकसित करण्यामध्ये राज्यातील आणि देशातील कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्र यांचा खूप मोलाचा वाटा आहे व या विद्यापीठांच्या कार्यामुळे शेतकऱ्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. पिकांचे नवनवीन व्हरायटी विकसित करण्यापासून ते शेती क्षेत्रासाठी आवश्यक यंत्रे विकसित करण्यापर्यंत कृषी विद्यापीठांची मोलाची भूमिका आहे.
यामध्ये विविध पिकांच्या व्हरायटी विकसित करून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणे एक महत्वपूर्ण काम विद्यापीठांच्या माध्यमातून पार पाडले जाते व अशाच पद्धतीने आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरघोस उसाचे उत्पादन मिळेल अशा दृष्टिकोनातून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ऊसाचा एक नवीन वाण प्रसारित केला आहे व या वाणाचे नाव आहे ‘फुले ऊस 15006’ हे होय.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केला ऊसाचा नवीन वाण
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून उसाचा एक नवीन वाण प्रसारित करण्यात आला असून या वाणाचे नाव आहे ‘फुले ऊस 15006’ हे होय. विद्यापीठाच्या माध्यमातून हा वाण प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रसारित करण्यात आलेला आहे.
आपण फुले ऊस 15006 या वाणाची वैशिष्ट्ये पाहिली तर हा उसाचे जास्त उत्पादन देणारा वाण असल्याचा दावा देखील शास्त्रज्ञांनी केला असून सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा मध्यम कालावधीत पक्व होणारा वाण असणार आहे.
या व्हरायटीच्या साखरेचा उतारा देखील इतर मराठ्यांच्या तुलनेत अधिक असणार आहे.ही जमिनीवर न लोळणारी व्हरायटी असून राज्यामध्ये सुरू तसेच पूर्व हंगामी आणि अडसाली लागवडीकरिता प्रसारित करण्यात आला असल्याची महत्त्वपूर्ण माहिती देखील शास्त्रज्ञांनी दिली आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या उसाच्या नवीन जातीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल हे मात्र नक्की.