Maize Farming: मका पेरणीचा टाइम झाला…! या जातीच्या मक्याची पेरणी करा, लाखोंची कमाई होणारचं

Maize Farming: सध्या देशात सर्वत्र खरीप हंगामातील (Kharif Season) पेरण्या करण्यासाठी शेतकरी बांधव (Farmer) लगबग करत असल्याचे चित्र आहे. राज्यात देखील शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांची पेरणी करत आहे तर काही ठिकाणी पेरणीची कामे आता पूर्ण झाली आहेत.

मात्र असे असले तरी ज्या शेतकरी बांधवांची अजून खरीप हंगामातील पेरणी बाकी आहे तसेच ज्या शेतकरी बांधवांना मक्‍याची पेरणी (Maize Sowing) करायची आहे, अशा शेतकऱ्यांसाठी आजची ही बातमी खास आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मित्रांनो आज आपण मक्याच्या एका सुधारित जातीची (Maize Variety) माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरून मका उत्पादक शेतकऱ्यांना (Maize Grower Farmer) याचा फायदा होईल. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.

मित्रांनो खरे पाहता आता जवळपास सर्वत्र मक्याची शेती (Farming) केली जाते. आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणात मका लागवड केली जाते. राज्यातील शेतकरी बांधव खरीप हंगामात मक्याची शेती करत असतात.

अशा परिस्थितीत जर शेतकरी बांधवांनी मक्याच्या सुधारित वाणाची निवड करून पेरणी केली तर निश्‍चितच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. मित्रांनो आम्ही मक्याच्या सिजेंटा NK 30+ या जातीविषयी आज आपणास अवगत करणार आहोत.

Syngenta NK 30+ मक्याची सुधारित जात
मक्याची ही जात मक्याच्या प्रगत वाणांपैकी एक आहे. ही जात 115-120 दिवसांत उत्पादन देण्यास होत असल्याचा दावा केला जातो. इतर जातींच्या तुलनेत लवकर तयार होणार्‍या या मक्याच्या वाणाला शेतकर्‍यांची पहिली पसंतीही राहिली आहे. मित्रांनो मक्याच्या या प्रगत जातीपासून एकरी 35 क्विंटलपर्यंत उत्पादन घेता येत असल्याचा दावाशेतकरी बांधव करत असतात.

या जातीच्या मक्याचा जमिनीत मुळांचा प्रसार जास्त असतो, त्यामुळे या जातीच्या मक्याचे पिक कापणीपर्यंत घट्ट उभे राहते. मित्रांनो जाणकार लोकांच्या मते, सिजेन्टा एनके 30+ या जातीची पेरणी खरीप हंगामात केल्यास यापासून चांगले दर्जेदार उत्पादन मिळते. परिणामी मका उत्पादक शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होते.

जाणकार लोकांच्या मते या जातीची पेरणी मे ते जुलै या दरम्यान केली पाहिजे. या जातीची पेरणी करताना शेतकरी बांधवांनी तीन सेंटीमीटर खोलीवर बियाणे पेरावे. आठ किलो ग्रॅम प्रती एकर एवढे बियाणे पुरेसे असल्याचे कृषी तज्ञ नमूद करतात. Sigenta NK 30+ पेरणीसाठी, ओळी ते ओळीतील अंतर 60 सेमी आणि रोप ते रोप 25 सेमी असावे.

Sygenta NK 30+ च्या चांगल्या उत्पादनासाठी NPK 48:24:20 प्रति एकर वापरण्याचा सल्ला दिला जातो. Sigenta NK 30+ जातीच्या मका पिकासाठी पाणी नियमितपणे 6-10 दिवसांच्या अंतराने द्यावे. शेतात सुरवातीला 30 दिवस जास्त पाणी साचू नये याची काळजी घ्यावी.

या राज्यासाठी उपयुक्त आहे हे वाण
Sygenta NK 30+ जातीची पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये पेरणी करता येऊ शकते.