Medicinal Plant Farming: भावांनो नोकरींपेक्षा अधिक कमाई करायची ना…! मग ‘या’ महागड्या औषधी वनस्पतीची शेती करा, लाखोंची कमाई होणारं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Medicinal Plant Farming: भारतात पूर्वी शेतकरी बांधव (Farmer) पारंपरिक पिकांची शेतीला (Farming) अधिक प्राधान्य देत होते. मात्र पारंपरिक पीकपद्धतीत शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च काढणे देखील अशक्य बनत चालल्याने आता देशातील शेतकरी बांधव औषधी वनस्पतीची शेती मोठ्या प्रमाणावर करत आहेत.

विशेष म्हणजे औषधी वनस्पतीचे शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर (Farmer Income) ठरत आहे. औषधी वनस्पतीच्या वाढत्या गरजा लक्षात घेता आपल्या देशात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची शेती केली जाऊ लागली आहे. दरम्यान, अनेक औषधी पिके आहेत, ज्यातून वनौषधींव्यतिरिक्त पशुखाद्य आणि इतर गोष्टींचा पुरवठा केला जातो.

बटरफ्लाय पीस (Butterfly Pease) म्हणून ओळखल्या जाणार्‍या अपराजिता देखील अशीच एक औषधी वनस्पती आहे. जाणकार लोकांच्या मते, अपराजिता या औषधी वनस्पतींची शेती (Aparajita Farming) शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरु शकते.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, अपराजिता एक औषधी पीक तर आहेच शिवाय हे एक डाळीवर्गीय पिकं आहे आणि चारा पीक आहे. डाळींच्या श्रेणीमध्ये अपराजिताचा समावेश केला जात असला तरी, त्याच्या फुलांचा वापर जगप्रसिद्ध ब्लू टी करण्यासाठी केला जातो. जो मधुमेहासारख्या आजारांवर रामबाण उपाय म्हणून काम करतो. अपराजिता वनस्पतीचे उर्वरित अवशेष पशुखाद्य म्हणून वापरले जाते. यामुळेच शेती करून शेतकरी तिप्पट उत्पादन आणि चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

अशा प्रकारे अपराजिता लागवड करा

  • अपराजिता हे एक सदाहरित औषधी पीक आहे, जे हिवाळा, उन्हाळा किंवा दुष्काळ यासारख्या परिस्थितीत चांगले उत्पादन देते. हे हवामान, जोखीम आणि खारट जमिनीच्या अनिश्चिततेमध्ये देखील विकसित होते.
  • त्याच्या लागवडीसाठी सुधारित वाणांचे बियाणे निवडावे, जेणेकरून पिकावर कीड व रोगांचा धोका राहणार नाही.
  • शेतकर्‍यांना हवे असल्यास ते कजरी-466, कजरी- 752, कजरी- 1433 किंवा ILCT-249, ILCT-278 या बियाण्यांसह अपराजिताची लागवड करू शकतात.
  • त्याच्या लागवडीसाठी हेक्टरी 20 ते 25 किलो बियाणे लागते.
  • अपराजिताचे सहपीक किंवा आंतरपीक घेतल्यास हेक्टरी 10 ते 15 किलो बियाणे पुरेसे आहे.
  • लागवडीपूर्वी बियाण्यांवर प्रक्रिया करावी, याशिवाय उन्हाळ्यात योग्य सिंचन व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला जातो.
  • शेंगा वेळेवर काढल्या पाहिजेत, अन्यथा शेंगा जमिनीवर पडू लागतात.
  • कापणीनंतर पिकांचे अवशेष पशुखाद्य म्हणून वापरले जातात आणि त्याच्या फुलांवर प्रक्रिया करून ब्लू टी सारखी अनेक उत्पादने तयार केली जातात.

अपराजिता पासून मिळणार इतकं उत्पादन

कडधान्यांच्या बाबतीत, अपराजिता या पिकाच्या लागवडीतून कोरडवाहू असलेल्या भागात 1 ते 3 टन कोरडा चारा आणि 100 ते 150 किलो बियाणे प्रति हेक्टरी मिळते. बागायती भागात त्याची लागवड अधिक फायदेशीर असते, ज्यामध्ये 8 ते 10 टन कोरडा चारा आणि 500 ​​ते 600 किलो बियाणे मिळते. भारतात याची व्यवसायिक शेती केली जाते.