मुगाच्या ‘या’ वाणाची लागवड करा आणि मिळवा हेक्टरी 12 ते 20 क्विंटल पर्यंत उत्पादन! लागवडीनंतर 70 दिवसात येईल हातात पैसा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी प्रामुख्याने कपाशी आणि सोयाबीन तसेच त्यासोबत मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. त्या खालोखाल तूर आणि मुगाची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात केली जाते. मुगाच्या लागवडीच्या दृष्टिकोनातून बघितले तर कपाशीसारख्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून देखील मूग लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

मुग या पिकाचा आंतरपीक म्हणून जर समावेश केला तर मुख्य पिकासाठी जो काही उत्पादन खर्च होतो तो मूग पिकातून निघण्यास मदत होते. बरेच शेतकरी आंतरपीक ऐवजी लवकरात लवकर आर्थिक उत्पन्न हातात मिळावे याकरिता देखील मूग पिकाचे नियोजन करतात.

मूग पिकाच्या अनेक व्हरायटी असून त्यापैकी चांगल्या उत्पादन देणाऱ्या व्हरायट्यांची लागवडीसाठी निवड करणे खूप गरजेचे असते. त्यामुळे या लेखामध्ये आपण मूग पिकाच्या एका महत्त्वपूर्ण व्हरायटीची माहिती या लेखात घेणार आहोत.

 मुगाचा MH1142 हे वाण आहे अधिक उत्पादनक्षम

मुग  पिकापासून भरगोस उत्पादन हवे असेल तर मुगाची MH1142 ही वरायटी खूप चांगली असून या वरायटीच्या  लागवडीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. जर आपण मुगाच्या या वरायटीचे वैशिष्ट्य पाहिले तर सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मूग पिकाच्या इतर वाणाच्या तुलनेमध्ये या वाणाची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम आहे.

मूग पिकावर येणारे जे काही बुरशीजन्य रोग असतात त्यापासून मुगाचा हा वाण स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम आहे. तसेच या वरायटीचा उत्पादनाचा कालावधी पाहिला तर तो साधारणपणे लागवड केल्यानंतर 63 ते 70 दिवसांचा आहे. या वाणाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा एकाच वेळी सारखाच काढणीला येतो.

तसेच याला पाने कमी असतात व झाडांची मर्यादित प्रमाणात वाढ होते. जर आपण मुगाच्या या वाणाची उत्पादन क्षमता पाहिली तर ती परिसरातील वातावरण आणि मातीतील फरक यानुसार बघितले तर बारा क्विंटल पासून ते 20 क्विंटलपर्यंत प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते.

तसेच या वाणाची वाढ जास्त होत नसल्यामुळे काढणी केल्यानंतर जास्त प्रमाणात अवशेष उरत नाही व ते जाळण्याची देखील गरज भासत नाही. झाडाचे अवशेष जमिनीतच कुजून जातात. त्यामुळे जर या खरीप हंगामामध्ये मूग लागवडीपासून चांगले उत्पादन व पैसा मिळवायचा असेल तर तुम्ही मुगाच्या MH1142 या वाणाची लागवड करू शकता.