Top 2 Agri Business: शेती करत असताना ‘हे’ शेतीसंबंधित व्यवसाय करा आणि लाखो कमवा! वाचा या व्यवसायामध्ये मिळणारे मार्जिन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Top 2 Agri Business:- बऱ्याच जणांना कुठलातरी व्यवसाय करायचा असतो. परंतु कुठला व्यवसाय करावा हे मात्र सुचत नाही. कारण आर्थिकदृष्ट्या जर स्वावलंबी व्हायचे असेल तर व्यवसाय करणे फायद्याचे ठरते. परंतु व्यवसाय सुरू करायचा म्हणजे त्यासाठी पैसा लागतो व पैशांअभावी बऱ्याचजणांना व्यवसाय करणे कठीण जाते.

दुसरी गोष्ट म्हणजे अनेकजण व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त खर्च करतात व योग्य व्यावसायिक कल्पना व नियोजन नसल्यामुळे व्यवसाय बंद पडतात. परंतु तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल व तुमच्याकडे शेती असेल तर कृषी क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

अगदी कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही योग्य नियोजनाने लाखो रुपये अशा व्यवसायांमधून कमवू शकतात.त्यामुळे शेती करत असताना शेतीला जोडधंदा म्हणून तुम्ही काही व्यवसाय करणे गरजेचे आहे. अशाच दोन व्यवसायांची माहिती या लेखामध्ये आपण घेऊ.

 शेतीची निगडित असलेली व्यवसाय मिळणारे मार्जिन

1- दूध विक्री व्यवसाय दुधाला वर्षभर मागणी असते हे आपल्याला माहिती आहे. ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग सर्व ठिकाणी दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालू शकतो. ग्रामीण भागामध्ये या व्यवसायासाठी दुधाची पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्धता असते. गावातून दूध खरेदी करून त्याचे पॅकिंग,

ब्रॅण्डिंग करून ते शहरामध्ये महागड्या दराने विकता येणे शक्य आहे. दुधाच्या गुणवत्तेकडे लक्ष देऊन चांगल्या ब्रॅण्डिंगसह शहरांमध्ये त्याचा पुरवठा केला तर 60 ते 70 रुपये प्रति लिटर दूध विकले जाऊ शकते. चांगले ब्रँडिंग आणि उत्पादनाचा दर्जा चांगला असेल तर ग्राहक दुधाला जास्त दर देतात.

जर आपण या व्यवसायाचे मार्जिन पाहिले तर सुरुवातीला ते कमी असू शकते. साधारणपणे गावातून 40 ते 45 रुपये प्रति लिटर या घाऊक दराने दूध खरेदी करता येते व त्याची पॅकिंग करून ते 60 रुपये प्रति लिटर दराने विकून चांगला नफा मिळवता येऊ शकतो.

जर छोट्या प्रमाणामध्ये हा व्यवसाय सुरू केला तर केवळ शंभर लिटर दूध पुरवठा केला तरी चालते. छोट्या प्रमाणात देखील तुम्ही लिटर मागे 15 ते 20 रुपयांची बचत करू शकतात व अशा प्रकारे दोन हजार रुपयांचा नफा मिळवता येणे शक्य आहे. अशाप्रकारे तुम्ही प्रत्येक महिन्याला 60 हजार रुपये कमवू शकतात.

2- मधमाशी पालन किंवा मधव्यवसाय मधाच्या औषधी उपयोगा व्यतिरिक्त तो ऊर्जा आणि नैसर्गिक गोडपणाचा स्त्रोत देखील मानला जातो. भारतामध्ये मधाची मागणी खूप जास्त आहे. नैसर्गिक आणि भेसळ नसलेले मध विकणारे ब्रँड फारच कमी आहेत.

अशा परिस्थितीमध्ये मधमाशी पालन करणारे शेतकरी हा व्यवसाय सहजपणे करू शकतात. तुमच्या उत्पादनाचे चांगले पॅकिंग, ब्रँडिंग आणि गुणवत्ता याकडे लक्ष देऊन तुम्ही या व्यवसायात चांगला ग्राहक वर्ग निर्माण करू शकतात.

जे लोक मध निर्मितीमध्ये गुंतलेले नाहीत ते मधमाशी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांशी संपर्क साधू शकता आणि अशा शेतकऱ्यांकडून मध खरेदी करून मधाचा व्यापार करू शकतात. जर आपण बाजारातील एक किलो मधाचा साधारणपणे दर पाहिला तर तो 350 ते 400 रुपये इतका आहे.

हे शेतकऱ्याकडून 150 ते 200 रुपयांना खरेदी करता येते व चांगले पॅकेजिंग आणि ब्रॅण्डिंग करून ते साडेतीनशे रुपये दराने विकता येते. सुरुवातीला या व्यवसायातून तुम्हाला पैसा कमी मिळू शकतो.परंतु जसे जसे तुमचा व्यवसाय वाढेल व ग्राहक वर्ग वाढत जाईल  त्या पद्धतीने या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होते.