Monsoon update: पाऊस आला मोठा..! आज राज्यात पावसाची दमदार बॅटिंग, पंजाबरावांचा आजचा मान्सून अंदाज

Monsoon Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. राजधानी मुंबई पावसाने (Rain) अक्षरश थैमान घातले आहे.

मुंबई व आजूबाजूच्या जिल्ह्यात जोरदार पावसामुळे (Monsoon News) जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. मुंबईत झालेल्या अति मुसळधार पावसामुळे (Monsoon) शहरात सर्वत्र जलमग्न अशी परिस्थिती निर्माण झाली असून वाहतूक कोंडी बघायला मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे मुंबईकरांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मुंबई शहरात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी घुसले आहेत. यामुळे रेल्वे प्रवास देखील विस्कळीत झाल्याचे दृश्य आहे.

राजधानी मुंबईप्रमाणेच राज्यातील अनेक भागात अतिमुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील अमरावती मध्ये देखील गेल्या काही दिवसांपूर्वी पूरसदृश्य परिस्थिती बघायला मिळाली.

यामुळे शेतकऱ्यांसमवेतच सामान्य नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे. ज्या ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस पडला आहे त्या ठिकाणी पिकांची नासाडी होत आहे यामुळे शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

मात्र असे असले तरी राज्यातील अनेक भागात विशेषता मराठवाड्यात अद्याप समाधान कारक असा मोसमी पाऊस बघायला मिळालेला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी पावसाविना संकटात सापडला आहे.

दुसरीकडे ज्या ठिकाणी अधिक पाऊस झाला आहे तेथील शेतकरी पिकांची नासाडी होईल यामुळे संकटात आला आहे. एकंदरीतच ज्या ठिकाणी कमी पाऊस पडला आहे तेथील तसेच ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडला आहे तेथील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

राज्यात ज्या भागात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही तेथील शेतकरी बांधव चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहेत. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपले एक वेगळे नाव करणाऱ्या पंजाबराव डख यांचा नवीनतम मान्सून अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) आता जाहीर करण्यात आला आहे.

चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया पंजाबराव यांचा जुलै महिन्यातला मान्सून अंदाज (Panjab Dakh Weather Report).

मित्रांनो पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी वर्तवलेल्या सुधारित मान्सून अंदाजानुसार, आज माहिती द्या राज्यात मोठा पाऊस होणार आहे. मात्र असे असले तरी, 11 जुलै ते 12 जुलै दरम्यान राज्यात पावसाची उघडीप बघायला मिळणार आहे.

त्यामुळे शेतकरी बांधवांनी 11 आणि 12 तारखेला आपली शेतीची कामे उरकून घ्यावीत असा सल्ला पंजाबराव यांनी दिला आहे. बारा तारखेनंतर मात्र राज्यात मौसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे 13 ते 17 जुलै दरम्यान पंजाबराव (Panjabrao Dakh News) आणि शेतकरी बांधवांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

13 जुलै ते 17 जुलै दरम्यान राज्यातील अनेक भागात विशेषतः पूर्व विदर्भ आणि राजधानी मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजधानी मुंबईत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज पंजाब रावांनी वर्तवला आहे. याशिवाय पूर्व विदर्भात देखील अतिवृष्टी सदृश्य पाऊस होणार आहे.

यामुळे शेतकरी बांधवांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी बांधवांनी या कालावधीत आपल्या पिकांची तसेच पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन देखील पंजाबराव यांनी यावेळी केले आहे.