Monsoon Update: पंजाबरावांचा मान्सून अंदाज..!! हवामानात झाला मोठा बदल, विठूरायाच्या पंढरपूर नगरीत अतिमुसळधार, ‘या’ जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता

Monsoon Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र मोसमी पावसाची (Rain) हजेरी बघायला मिळत आहे. राजधानी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून पावसामुळे राजधानी मुंबई अक्षरशा तुंबली आहे. यामुळे मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शिवाय पुढील तीन-चार दिवस भारतीय हवामान खात्याने मुंबईत जोरदार पावसाची (Monsoon) शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांना या वेळी सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. राज्यात देखील अनेक भागात अतिवृष्टी सारखा पाऊस होत असून अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती बघायला मिळाली.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे शेतकरी बांधवांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असून पिकांची नासाडी होत आहे. शिवाय राज्यातील मराठवाड्यात अनेक भागात मोसमी पाऊस बघायला मिळाला नव्हता मात्र काल मराठवाड्यात काही ठिकाणी समाधानकारक पाऊस (Monsoon News) झाला आहे.

असे असले तरी अजूनही मराठवाड्यात शेतकरी बांधव जोरदार मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. एकंदरीत ज्या ठिकाणी अधिक पाऊस झाला आहे त्या ठिकाणी पिकांची नासाडी होत आहे आणि ज्या ठिकाणी कमी पाऊस झाला आहे त्या ठिकाणी पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे.

दरम्यान, आपल्या हवामान अंदाजासाठी महाराष्ट्रात विशेष ओळख असलेले पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) जारी करण्यात आला आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांच्या मते, आज आणि उद्या महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता आहे.

पंजाबरावं यांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार (Panjab Dakh Weather Update), आजपासून सर्वत्र मोसमी पाऊस बघायला मिळेल मात्र हवामानात बदल झाल्याने पंढरपूर व आजूबाजूच्या परिसरात अतिवृष्टी सारखा पाऊस पडणार आहे. यामुळे आषाढी एकादशी निमित्ताने विठूरायाच्या पंढरपूर जाणाऱ्या भाविकांना यावेळी मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागू शकते.

दरम्यान पंजाब रावांनी (Panjabrao Dakh News) भाविकांना सतर्क राहण्याचा इशारा यावेळी दिला आहे. वारीसाठी गेलेले भाविक आता पंढरपूरच्या अगदी जवळ असून आज अनेक दिंड्या पंढरपूर गाठण्याची शक्यता आहे. यामुळे भाविक भक्तांनी यावेळी सतर्क राहणे अतिमहत्‍वाचे आहे.

पंजाबराव यांच्या मते नऊ ते दहा जुलै संपूर्ण राज्यात मोठा पाऊस होणार आहे. पंढरपूर, लातूर, सोलापूर, बीड अहमदनगर, सातारा, सांगली, कोकणची किनारपट्टी, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या विभागात मोठा पाऊस कोसळणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे.