Monsoon Update: पंजाबरावांचा मान्सून अंदाज…! राज्यात ‘या’ ठिकाणी अतिवृष्टी होणारं, वाचा डख यांचा नवीन अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोसमी पावसाचा (Monsoon) तडाखा सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसात अतिवृष्टी सारखा पाऊस (Monsoon News) बघायला मिळाला. यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांची डोकेदुखी देखील वाढली आहे.

अधिक पाऊस (Rain) झाला असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात पिकांची नासाडी होत आहे. दरम्यान, पावसाविना राहिलेल्या मराठवाड्यात देखील आता मोसमी पाऊस बरसु लागला आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र पेरणीची कामे आता अंतिम टप्प्यात आहेत.

राज्यातील अनेक भागात पेरणीची कामे उरकली देखील आहेत. खरं पाहता आता मोसमी पावसाचा ते राज्यात पोषक वातावरण तयार होत असल्याने पुढील तीन ते चार दिवस राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाची स्थिती कायम राहणार आहे.

दरम्यान हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या पंजाबराव डख साहेबांचा मान्सून अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) आता नुकताच समोर आला आहे.

पंजाबरावांनी (Panjabrao Dakh) शेतकऱ्यांसाठी आज आणि उद्याचे दिवस महत्त्वाचे असल्याचे सांगितले. पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांच्या मते, शेतकरी बांधवांनी 11 आणि 12 जुलै यादरम्यान आपली शेतीची कामे करून घ्यावीत. कारण की, आज आणि उद्या पावसाची उघडीप राहणार आहे.

मात्र 13 तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे तेरा तारखेपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. 13 जुलै ते 17 जुलै या दरम्यान राज्यात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे.

यामुळे शेतकरी बांधवांनी आज आणि उद्या आपल्या शेतीची कामे करून ठेवावेत, कारण तेरा तारखेपासून सलग चार दिवस राज्यात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. यामुळे या कालावधीत शेतकरी बांधवांना आपली शेतीची कामे करता येणार नाहीत.

13 जुलै ते 17 जुलै दरम्यान राजधानी मुंबईत अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळणार आहे. यादरम्यान विदर्भातील पूर्व भागात देखील अति-मुसळधार पाऊस राहणार आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार (Panjab Dakh Weather Report).

हवामानात मोठा बदल झाला असल्याने लातूर, सोलापूर, बीड, अहमदनगर, सातारा, सांगली, पुणे, कोकण किनारपट्टी, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या भागात पावसाची जोरदार हजेरी राहणार आहे. या कालावधीत उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.