Mulching Paper Subsidy: सरकारी अनुदान मिळवा व प्लास्टिक मल्चिंग पेपरच्या सहाय्याने पिक उत्पादन वाढवा! वाचा योजनेची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mulching Paper Subsidy:- कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हा दृष्टिकोन समोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात येत असून कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या असलेल्या वेगवेगळ्या घटकांकरिता या योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्यात येते.

या अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला ठिबक व तुषार सिंचन  आणि महत्वाचे म्हणजे सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री सौर कृषी योजनेसारख्या अनेक योजना आपल्याला सांगता येतील.

त्यातीलच शेतीच्या संबंधित असलेला व भाजीपाला, फळ पिकांसाठी महत्त्वाचे असलेला प्लास्टिक मल्चिंग पेपर करिता देखील आता राज्य सरकारच्या माध्यमातून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपर करता अनुदान दिले जाते. याविषयीची माहिती या लेखात घेऊ.

 प्लास्टिक मल्चिंग पेपर करता किती मिळते अनुदान?

राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपरचा जो काही वापर दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून शासनाकडून 50 टक्के अनुदान दिले जाते. जर आपण एका एकर करिता प्लास्टिक मल्चिंग पेपरचा एकूण खर्च पाहिला तर तो 32000 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून शासन 50 टक्के अनुदान देते.

म्हणजेच 16 हजार रुपयांचे अनुदान प्रति हेक्टरसाठी तुम्हाला मिळते. जास्तीत जास्त दोन हेक्टर मर्यादेपर्यंत हे अनुदान देण्यात येणार असून डोंगराळ भागाकरिता वाढीव खर्च 36 हजार 800 याप्रमाणे 50 टक्के अनुदान डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना दिले जाते. या योजनेअंतर्गत शेतकरी समूह, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच बचत गट व वैयक्तिक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळते.

 मल्चिंग पेपर अनुदानासाठी अर्ज करताना लागतील ही कागदपत्रे

तुम्हाला देखील मल्चिंग पेपर अनुदानाकरिता अर्ज करायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला आधार कार्ड, आधार संलग्न असलेले बँकेचे पासबुक, जमिनीचा सातबारा व आठ अ चा उतारा व शेतीतील पिकांची माहिती इत्यादी कागदपत्रे लागते.

 प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदानासाठी अर्ज कसा कराल?

1- प्लास्टिक मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत तुम्हाला अनुदान मिळवायचे असेल तर अर्ज करण्याकरिता महाडिबीटी या शेतकरी पोर्टलवर जाणे आवश्यक आहे व त्या ठिकाणी प्लास्टिक मल्चिंग पेपर योजना बटनावर क्लिक करावे.

2- महाडीबीटी पोर्टल वर तुम्ही अगोदर नोंदणी केली असेल तर तेव्हा तुम्हाला मिळालेला युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करावे.

3- त्यानंतर फलोत्पादन या पर्यायासमोरील बाबी निवडा या बटणावर क्लिक करून त्यामध्ये प्लास्टिक मल्चिंग पेपर हा पर्याय शोधून त्याची निवड करावी.

4- त्यानंतर तुम्हाला जितक्या क्षेत्रावर मल्चिंग हवा आहे तेवढे क्षेत्र नमूद करावे व अर्ज जतन करा या पर्यायावर क्लिक करावे.

5- महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही शासनाच्या एकापेक्षा जास्त योजनेकरिता अर्ज केला असेल तर त्यामध्ये प्राधान्य क्रमांक निवडणे गरजेचे असून तो निवडल्यानंतर सर्वात शेवटी अर्ज सबमिट करा.

6- या घटकांतर्गत तुम्ही प्रथम अर्ज करत असाल तर त्याकरिता तुम्हाला 23 रुपये 60 पैसे इतके शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागते.

या पद्धतीने तुम्ही घरबसल्या प्लास्टिक मल्चिंग पेपर योजनेकरिता अर्ज करू शकता व प्लास्टिक मल्चिंग पेपर वर 50% अनुदान मिळवू शकता.