शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाबार्ड कडून करण्यात आली पीक कर्ज उचलच्या मर्यादेमध्ये वाढ; वाचा कोणत्या पिकाला किती मिळेल उचल?

Ajay Patil
Published:
crop loan

सध्या जर आपण शेतीची एकंदरी स्थिती पाहिली तर गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, शेतीसाठी लागणाऱ्या आवश्यक असलेल्या गोष्टींचा वाढता खर्च आणि त्या दृष्टिकोनातून मिळणारा कमी बाजार भाव त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या रासायनिक खतांच्या दरामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मजुरीच्या खर्चात देखील वाढ झाली आहे. एवढेच काय तर डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे शेतीच्या मशागतीचा खर्च देखील प्रचंड प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना जे काही पीक कर्ज मिळते ते देखील आता उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये वाढीव मिळावे अशा प्रकारचा शेतकऱ्यांचा आग्रह दिसून येतो. त्यामुळे आता नाबार्डच्या माध्यमातून पीक कर्ज उचलीच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली असून आता विविध पिकांकरिता वेगवेगळ्या प्रकारे वाढीव दराने पीक कर्ज मिळणार आहे. यामध्ये उदाहरणच घ्यायचे झाले तर सर्वाधिक पीक कर्ज हे आडसाली ऊसाला मिळणार असून ते हेक्टरी एक लाख 70 हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे.

 नाबार्डकडून पीककर्ज उचलीच्या मर्यादेत वाढ

गेल्या काही वर्षापासून पिकांचा वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर नाबार्डच्या माध्यमातून पीक कर्ज उचलीच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली असून त्यानुसार आता सर्वाधिक पीक कर्ज हे आडसाली ऊसाला मिळणार आहे व त्याची मर्यादा हेक्टरी एक लाख 70 हजार रुपये करण्यात आली आहे.

तसेच भात पिकाला 50 हजार तर सोयाबीनला 66 हजार रुपये हेक्टरी मिळणार आहेत. राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या शिफारसी नंतर कोल्हापूर जिल्हा बँक 2024-25 या हंगामा करिता देण्यात येणाऱ्या खरीप पिकासाठी याची अंमलबजावणी करणार आहे. यासंबंधीची प्रक्रिया पाहिली तर

यामध्ये जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या माध्यमातून कर्ज वाढीची शिफारस केली जाते व त्याची तपासणी राज्यस्तरीय तांत्रिक समिती करते. त्यानंतर नाबार्डच्या मान्यतेने वाढीव दराच्या सूचना वित्तीय संस्थांना दिल्या जातात. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा बँकेने पीक कर्जाच्या दरामध्ये वाढ केली आहे.

 कसे राहील पीक कर्ज उचलीचे स्वरूप?

या वाढीव पीक कर्ज उचल मर्यादेनुसार आता आडसाली ऊसाला एक लाख 70 हजार रुपये, पूर्व हंगामी ऊसाला एक लाख 40 हजार रुपये, सुरू ऊस लागण एक लाख 35 हजार रुपये, ऊस खोडवा एक लाख पंधरा हजार रुपये, भात पिकासाठी 50 हजार रुपये, सोयाबीन करीता 66 हजार रुपये, नागलीकरिता 36 हजार आठशे रुपये, फळबागांकरिता 55 हजार रुपये, पालेभाज्या तीस हजार रुपये अशी उचल असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe