Expensive Mango: ना हापूस,ना केसर तर ‘हा’आहे जगातील सर्वात महागडा आंबा! वाचाल किंमत तर डोळे होतील पांढरे, वाचा माहिती

Ajay Patil
Published:
Expensive Mango

Expensive Mango :- भारतामध्ये अनेक हंगामनिहाय फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असते. यामध्ये जर आपण उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर आंबा आणि कलिंगड या फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर भारतात आणि महाराष्ट्रात घेतले जाते.

उन्हाळ्याच्या कालावधीत तर बऱ्याच घरांमध्ये आमरसाच्या बेत आखला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या कालावधीत आंब्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये या कालावधीत विविध प्रजातीचे आंबे दाखल होतात.

आंब्याच्या विविध प्रजातींमध्ये महाराष्ट्रातील कोकण विभागात पिकणाऱ्या हापूस आंब्याला भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मोठी मागणी आहे. साधारणपणे दीड ते दोन हजार रुपये डझन इतक्या किमतीने हापूस आंबा विकला जातो.

तसेच भारतामध्ये हापूस आंबा व्यतिरिक्त दशेरी तसेच लंगडा, केशर सारख्या इतर आंब्याच्या प्रजाती देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. भारत हा आंब्याचा प्रमुख निर्यातदार देश म्हणून देखील जगाच्या पाठीवर ओळखला जातो.

परंतु जगाच्या दृष्टिकोनातून बघितले तर भारताच्या हापूस आंबा व्यतिरिक्त जगामध्ये सर्वात महागडा आंबा असून त्याची किंमत लाखात आहे. याच आंब्याची किंमत आणि वैशिष्ट्ये आपण या लेखात बघणार आहोत.

हा आहे जगातील सर्वात महाग आंबा

जर आपण जगातील सर्वात महागडा आंबा पाहिला तर त्याचे उत्पादन भारतामध्ये नव्हे तर जपानमध्ये होते. जपानमध्ये उत्पादित होणाऱ्या या आंब्याचे नाव मियाझाकी आंबा असे असून त्याचा रंग जांभळा असतो.

हा आंबा जपान येथील मियाझाकी शहरांमध्ये उत्पादित केला जातो व त्यामुळे त्याला मियाझाकी आंबा हे नाव पडले आहे. मियाझाकी आंबा आता जपान व्यतिरिक्त थायलंड, फिलिपाईन्स, बांगलादेश व भारतामध्ये देखील या आंब्याची लागवड केली जात आहे.

मियाझाकी आंब्याची वैशिष्ट्ये आणि प्रतिकिलोची किंमत

या प्रजातीचा आंबा लागवड करण्यासाठी उष्ण आणि सूर्यप्रकाश असणारे हवामान अनुकूल असते व उत्पादित होणाऱ्या या आंब्याचे वजन 300 ग्रॅम पर्यंत असते. या आंब्याला जपान मध्ये तैयो-नो-टोमागो नावाने देखील ओळखतात.

जेव्हा आंबा पिकतो तेव्हा जांभळा आणि लाल होतो. तसेच खायला हा अतिशय गोड आणि स्वादिष्ट असतो तसेच रसाळ देखील भरपूर प्रमाणामध्ये असतो. या आंब्याच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर जागतिक बाजारामध्ये मियाझाकी आंब्याची किंमत अडीच ते तीन लाख रुपये प्रतिकिलो असून जे शेतकरी या आंब्याची लागवड करतात त्यांना या त्याच्या सुरक्षेकरिता उपाययोजना करावा लागतात.

लाखात किंमत असल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना हा आंबा विकत घेणे परवडत नाही. परंतु काही हौशी आणि श्रीमंत लोक या आंब्याची खरेदी करतात. तसेच या आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे बाजारात यांची विक्री होत नाही तर त्यांचा लिलाव केला जातो. भारतामध्ये रायपूर आणि सिलिगुडी या ठिकाणी जो काही आंबा महोत्सव पार पडला त्यामध्ये मियाझाकी आंबा प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe