खुशखबर ! महाराष्ट्रातील कृषी शास्त्रज्ञांनी विकसित केले उडीद, मुगाचे नवीन वाण ; शेतकऱ्यांना मिळणार भरघोस उत्पादन

New Crop Variety : जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद येथील महात्मा फुले संशोधन केंद्रातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय गोड बातमी समोर येत आहे. या ठिकाणी मुगाचे आणि उडीदाचे नवीन वाण महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आले आहेत.

उडीद व मुगाचे नव्याने विकसित केलेले हे नवीन वाण भरघोस उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा संशोधकांनी केला असून या दोन्ही जातीला संशोधन व विकास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील मूग उत्पादक आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ममुराबाद येथील संशोधन केंद्रात कार्यरत असलेले डॉक्टर एस डी राजपूत यांनी उडीद व मुगाचे नवीन वाण प्रसारित केले आहे. राजपूत हे संशोधन केंद्रात तेलबिया संशोधन विभागात कडधान्य पैदास विभागात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

दरम्यान संशोधन केंद्राकडून विकसित आणि प्रसारित करण्यात आलेले हे वाण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी भरघोस उत्पादन मिळवून देण्यास सक्षम ठरणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. संशोधन केंद्राने विकसित केलेल्या उडदाच्या नवीन वाणाला फुलेराजन असं नाव ठेवण्यात आलं असून मुगाच्या नवीन जातीला फुले सुवर्ण असं नाव ठेवण्यात आला आहे.

उडदाच्या नवीन जातीची विशेषता :- उडदाचे हे नव्याने विकसित झालेले फुले राजन खरीप हंगामात लागवडीसाठी प्रसारित झाले आहे. या जातीपासून खरीप हंगामात कमी कालावधीत अधिक उत्पादन मिळवता येणे शक्य होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी या जातीचा विशेष फायदा होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेत जमिनीसाठी हे वाण अधिक सात्विक आणि पोषक राहणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

मुगाच्या नवीन जातीची विशेषता :- मुगाची नवीन जात अर्थातच फुले सुवर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेष उपयुक्त राहणार आहे. ही जात खरीप हंगामात इतर जातींच्या तुलनेत अधिक उत्पादन देते. विशेष म्हणजे ही जात खरीप हंगामात कमी कालावधीत भरघोस उत्पादन देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. निश्चितच या जातीच्या मुगापासून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळेल आणि त्यांच्या उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ होईल.

डॉक्टर एसडी राजपूत जे की मुरादाबाद संशोधन केंद्रात संशोधक आहेत त्यांनी या वाणाबाबत माहिती देताना सांगितले की, हे दोन्ही वाण इतर वाणाच्या तुलनेत सरस आहेत. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासाठी या दोन्ही जाती पूरक ठरणार आहेत. एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा यामुळे फायदा निश्चित आहे.