Onion Rate:कांद्याचे भाव वाढतील का?कांद्याचे भाव का वाढले नाहीत? कसे वाढू शकतात कांद्याचे भाव? वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate:- जर आपण संपूर्ण हंगामाचा विचार केला तर यावर्षी कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. कांदा पिकवण्याकरिता लागणारा खर्च तर सोडाच परंतु वाहतूक खर्च देखील निघणे मुश्किल झाले. तसे पाहायला गेले तर कांदा बाजार भावाचा प्रश्न हा नवीन नसून गेल्या कित्येक वर्षापासून कांदा दरावरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागते. कधी कधी कांद्याला अपेक्षेइतका दर मिळतो. परंतु बऱ्याचदा कांदा आर्थिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसानच करतो.

कांदा दर घसरण्यामागे सरकारची धोरणे देखील नक्कीच कारणीभूत आहेत.तसेच बऱ्याच दिवसाच्या नंतर कांद्याच्या दरात थोडीफार वाढ व्हायला लागली होती परंतु मध्येच केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर शुल्क लागू केल्यामुळे परत कांद्याचे दर संपूर्ण देशामध्ये घसरायला लागले.

तसे पाहायला गेले तर कांद्याची आवक हव्या त्या प्रमाणात नसताना देखील कांद्याचे दर वाढण्याऐवजी घसरत असल्याचे सध्या स्थिती आहे. याच अनुषंगाने आपण कांद्याच्या बाजारभावावर परिणाम करणारे घटक व इतर महत्त्वाची माहिती बघणार आहोत.

 कांद्याचे भाव वाढण्यामागील कारणे

यावर्षी साठवणूक केलेला कांदा देखील मोठ्या प्रमाणावर खराब होत असल्यामुळे आणि शेतकऱ्यांकडे कांद्याचा साठाच नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याची आवक घटलेली आहे. जर आपण मागणी पुरवठ्याचा विचार केला तर पुरवठा कमी असताना देखील बाजार भाव वाढण्याऐवजी त्यामध्ये घसरण पाहायला मिळत आहे. सध्या 1500 ते 2000 पर्यंतचा दर कांद्याला मिळत आहे.

जेव्हापासून केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर शुल्क आकारले. तेव्हापासून कांद्याचे निर्यात देखील कमी झाली व याचा थेट परिणाम कांद्याच्या दरावर बघायला मिळत आहे. कांद्याच्या निर्यातीवर जेव्हा शुल्क लागू न होते तेव्हा 2700 पर्यंत बाजारभाव गेला होता.

परंतु सरकारने अचानक 40 टक्क्यांची निर्यात शुल्क लावल्यामुळे कांद्याचे दर घसरून 2000 प्रतिक्विंटर वर पोहोचले. यावरून केंद्र सरकारचे धोरण हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मारक असल्याचे दिसून येते. तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे मागच्या वर्षाचा कांद्याचा साठा उपलब्ध असल्यामुळे देखील त्याचा परिणाम थेट बाजार समिती यांवर होत असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अनेक कांदा व्यापाऱ्यांनी आणि काही बाजार समित्यांनी कांद्याच्या दरावर दबाव यावा याकरिता कांद्याची साठवण केली असल्यामुळे देखील ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

 यामुळे कांद्याचे भाव वाढू शकतात

कांद्याच्या निर्यातीवर लावलेले शुल्क जर सरकारने कमी केले तर कांद्याचे भाव वाढू शकतात तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणे देखील गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बाजार समितीमधील जे काही सदस्य आहेत त्यांना कांदा साठवणूक करण्यासाठीची एक निश्चित मर्यादा ठेवणे गरजेचे आहे.

या व अशा अनेक उपाय योजना कांदा दर वाढीसाठी फायद्याचे ठरू शकतात. सगळ्यात महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारचे धोरण यांचा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे होणे खूप गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसून येत नाही.