Online Land Map: ‘ही’ पद्धत वापरा आणि जमिनीचा नकाशा पहा सेकंदात! वाचा संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Online Land Map:- जमीन हा विषय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असून या दृष्टिकोनातून जमिनीशी संबंधित असलेले संपूर्ण कागदपत्रांना खूप महत्त्व असते. कारण जमिनीचे कागदपत्रांवरच आपल्याला त्या जमिनीचे सगळी माहिती मिळत असते. यामध्ये जमिनीची खरेदी खतापासून ते सातबारा, आठ अ चा उतारा तसेच फेरफार नोंदी यांना अनन्य साधारण महत्त्व आहे.

जमिनीच्या बाबतीत जी काही कामे असतात ते शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून केले जातात. यामध्ये जर आपण जमिनीचा नकाशा याचा विचार केला तर हे खूप महत्त्वाचे असून शेती विषय कुठलाही कामांकरिता किंवा जमिनीचे खरेदी विक्रीचा व्यवहार यामध्ये जमिनीच्या नकाशाला म्हणजेच लँड मॅपला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

एखादी मालमत्ता विकत घेताना किंवा जमीन विकताना मालमत्तेचा इतिहास पाहण्यासाठी, एखाद्या शेतात जमिनीतून रस्ता काढण्यासाठी, एखादी खरेदी विक्री केली जाणारी जमिनीची हद्द किती आणि कुठपर्यंत आहे? या गोष्टी जाणून घेण्यासाठी जमिनीचा नकाशा खूप महत्त्वाचा असतो व त्यामुळे तो पहावा लागतो.

त्यामुळे महत्त्वाच्या असलेला हा जमिनीचा नकाशा तुम्ही तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप वरून देखील आरामात अगदी घरबसल्या काढू शकतात. नेमका संपूर्ण गावचा नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी अशा पद्धतीने प्रोसेस करावी लागते? याबद्दलची माहिती या लेखात घेणार आहोत.

 अशा पद्धतीने ऑनलाइन पहा तुमच्या गावचा नकाशा

1- याकरिता तुम्हाला सगळ्यात अगोदर mahabhunakasha.mahabhumi.gov.in या लिंक ला क्लिक करावे लागेल व त्यानंतर ही लिंक ओपन होईल. ही लिंक ओपन झाल्यावर तुमच्या समोर एक पेज दिसेल व त्याच्या डाव्या बाजूला लोकेशन दिसेल. यामध्ये राज्य कॅटेगरी असते व या कॅटेगरीमध्ये अर्बन आणि रुरल असे दोन पर्याय त्या ठिकाणी येतील.

2- तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर अर्बन हा पर्याय निवडावा आणि ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल हा पर्याय निवडावा.

3- त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गावाचा पर्याय निवडावा.

4- हे पर्याय निवडल्यानंतर व्हिलेज मॅप या पर्यायावर जावे.

5- या पर्यायावर गेल्यानंतर पुढे प्रोसेस करावे.

6- त्यानंतर डाव्या बाजूच्या बटनावर प्लॉट प्रमाणे जमीन शोधता येते.

7- यामध्ये सर्च बाय प्लॉट नंबर या वाक्याचा एक रकाना दिसतो.

8- या ठिकाणी जमिनीचा गट क्रमांक टाकून सर्च बटनावर क्लिक करावे.

9- सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा गट क्रमांक असलेल्या जमिनीचा नकाशा तुमच्या स्क्रीनवर दिसतो.

अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहू शकता.