Panjabrao Dakh : शेतकऱ्यांनो, शेतीत ‘ही’ चूक करू नका, नाहीतर…; पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना सल्ला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh : शेतकरी बांधवांनी निसर्गाचा अंदाज बांधत शेती केली पाहिजे. निसर्गाविरुद्ध जाऊन शेती करणे शेतकऱ्यांसाठी तोट्याचे सिद्ध होऊ शकते, असं प्रतिपादन हवामान तज्ञ पंजाबरावं डख यांनी केल आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील व्यंकटेश मल्टीस्टेट कुकाणाचे आठव्या वर्धापणाच्या दिनी पंजाबरावं डख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असताना त्यांनी हे वक्तव्य दिल आहे. याशिवाय डख यांनी, हवामान बदलाबद्दल देखील माहिती दिली आहे. पंजाबराव यांच्या मते मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली असल्याने 1995 पासून महाराष्ट्रातील पाऊस हा गुजरातकडे कोसळू लागला आहे.

आता यापुढे कमी अधिक प्रमाणात पाऊस पडणार आहे यामुळे शेतीचे नियोजन निसर्गावर आधारित ठेवणे आवश्यक राहणार आहे. त्यांनी सांगितलं की, पावसाची दिशा गेल्या काही वर्षांपासून बदलली असल्याने पावसाचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय वृक्षतोड देखील मोठ्या प्रमाणात झाली असल्याने तापमानात वाढ झाली आहे.

यामुळे अवकाळी पाऊस वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच डखं यांनी पुढील वर्षी महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे भाकीत वर्तवल आहे. पुढील मान्सून आठ जूनलाच सक्रिय होणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच चालू महिन्यातही पावसाची शक्यता असल्याचे डख यांनी सांगितले आहे. 

21 डिसेंबर ते 23 डिसेंबर यादरम्यान पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, नववर्षात 2 जानेवारी ते 4 जानेवारी दरम्यानही पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. निश्चितच रब्बी हंगामाची लगबग करत असलेल्या शेतकरी बांधवांची यामुळे डोकेदुखी वाढणार आहे.

आधी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं होत, यामुळे शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळाल आहे. आता पुन्हा एकदा रब्बी हंगामात तोच सिलसिला राहणार असल्याचा पंजाबरावांचा अंदाज शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढवू पाहत आहे.

एकंदरीत निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. दरम्यान पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीच्या कामाचे नियोजन आखले पाहिजे.