Panjabrao Dakh : पंजाबरावांचा 23 ऑक्टोबरपर्यंतचा हवामान अंदाज आला रे…! 14 आणि 15 ऑक्टोबरला ‘या’ जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळणार, वाचा संपूर्ण अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh : राज्यात सध्या परतीच्या पावसाचा (Rain) जोर कायम आहे. मात्र असे असले तरी भारतीय हवामान विभागाने आज उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची उघडीप राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मते आज फक्त दक्षिण कोकण दक्षिण मध्यमहाराष्ट्र या भागात पाऊस (Monsoon) कोसळणार आहे. यामुळे निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला होता.

मात्र हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी भारतीय हवामान विभागाच्या उलट आपला अंदाज दिला आहे. हवामान अंदाजासाठी एक विश्वासाचे नाव म्हणून पंजाबराव डख यांच्याकडे पाहिले जाते.

पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजाकडे (Panjabrao Dakh Havaman Andaj) शेतकऱ्यांचे लक्ष लागून असते. यामुळे आम्ही रोजच शेतकरी बांधवांसाठी पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांचा हवामान अंदाज घेऊन हजर होतं असतो. मित्रांनो पंजाबराव डख यांनी वर्तवलेले आपल्या नवीनतम सुधारित हवामान अंदाजानुसार (Panjab Dakh Weather Report) 14 आणि 15 ऑक्‍टोबर रोजी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

पंजाबराव यांच्यामते 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. अहमदनगरमध्ये शिर्डी आणि राहुरी या भागात सर्वाधिक पावसाची शक्यता असल्याचे डख यांनी नमूद केल आहे. याव्यतिरिक्त छत्रपती संभाजी महाराज नगर, वैजापूर, सिल्लोड, कन्नड, कोकण, देवगड, कोल्हापूर, जालना, परभणी, पैठण, पुणे, खामगाव, अमरावती, अकोला, बुलढाणा, सांगली, इचलकरंजी, अकलूज, सोलापूर, मुंबई, कल्याण, गोरेगाव या ठिकाणी हे दोन दिवस अति मुसळधार पावसाचे राहणार आहेत.

तसेच पंजाबराव यांच्या मते 16 तारखेला मात्र महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार असून कडक ऊन पडणार आहे. तसेच राज्यात 18 तारखे पासून थंडीला सुरुवात होणार आहे. मात्र असे असले तरी 22 आणि 23 तारखेला राज्यात पावसाची शक्यता आहे. पंजाबराव यांच्या मते 22 आणि 23 तारखेला राज्यात सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. निश्चितच सातारा सांगली आणि कोल्हापूर हा द्राक्ष पट्टा असल्याने या विभागातील शेतकरी बांधवांना सतर्क राहण्याचे आवाहन पंजाबराव यांनी केले आहे.

याशिवाय 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी राज्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांना आपली तसेच आपल्या पशुधनाची आणि आपल्या शेती पिकाची काळजी घेण्याचे आव्हान केले जात आहे. दरम्यान सध्या कोसळत असलेला पाऊस रब्बी हंगामासाठी पोषक असल्याचे जाणकार लोकांकडून सांगितले जात आहे. मात्र असे असले तरी खरीप हंगामातील काढण्यासाठी आलेल्या पिकांना याचा मोठा फटका बसत आहे.