Panjabrao Dakh News : ब्रेकिंग ; पंजाबरावांचा जानेवारी महिन्यातला हवामान अंदाज ! ‘या’ दिवशी पाऊस कोसळणार

Panjabrao Dakh News : पंजाबराव डख हे आपल्या हवामान अंदाजासाठी कायमच चर्चेत राहत असतात. पंजाबरावांचा हवामान अंदाज शेतकरी बांधवांच्या विश्वासात खरा उतरला आहे.

शेतकऱ्यांच्या मते त्यांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. दोन-तीन दिवसापूर्वी महाराष्ट्रात मॅनदोस चक्रीवादळामुळे बहुतांशी जिल्ह्यात पाऊस कोसळत होता. आता चक्रीवादळ निवळले आहे आणि महाराष्ट्रात हवामान कोरड आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी गारठा वाढला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे पुन्हा एकदा शेती कामाला वेग आला आहे. दरम्यान आता पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज शेतकऱ्यांची डोकेदुःखी वाढवत आहे. पंजाबरावांच्या मते 21, 22, 23 डिसेंबर राज्यात पुन्हा एकदा पाऊस कोसळणार आहे. हे तीन दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळू शकतो असा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे.

विशेष म्हणजे राज्यात जानेवारी महिन्यातही पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव कडून वर्तवण्यात आला आहे. जानेवारी महिन्यातील दोन तीन आणि चार जानेवारी रोजी राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे. साहजिकच पंजाबरावांचा हा अंदाज जर सत्यात उतरला तर शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील प्रवास देखील मोठा आव्हानात्मक राहणार आहे. यामुळे खरीप प्रमाणेच रब्बी मध्ये देखील नुकसान होण्याची शक्यता आहे.

याशिवाय पंजाब रावांनी पुढील वर्षी मानसून आठ जूनला राज्यात प्रवेश करेल असा अंदाज वर्तवला आहे. तसेच पुढच्या मानसून मध्ये राज्यात अधिक पाऊस राहणार असल्याचे पंजाबरावांचे भाकित आहे. म्हणजेचं पुढील वर्षी पाऊसमान चांगला राहील परिणामी शेतकरी बांधवांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.

पण यावर्षी मात्र पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. निश्चितच आता या महिन्यातील 21, 22, 23 डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील दोन, तीन आणि चार जानेवारी रोजी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची व आपली काळजी घेतली पाहिजे.