Panjabrao Dakh : शेतकऱ्यांनो सतर्क राहा ! महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून पुन्हा कोसळणार पाऊस ; पंजाबरावांचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh : राज्यातील शेतकरी बांधव सध्या रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी लगबग करत आहेत. तसेच खरीप हंगामातील कापूस तूर हे वावरात उभी असलेली पिके जोपासण्यामध्ये व्यस्त आहेत. खरीप हंगामातील कापूस आणि तूर हे पिके अंतिम टप्प्यात असून कापसाची वेचणी सुरू आहे.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, जवस यांसारखी पिकांची पेरणी देखील शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. खरं पाहता खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाचा विलंब झाला यामुळे खरिपातील पेरण्या लांबल्या.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली त्यामुळे खरीप हंगामातील ऐन वाढीच्या अवस्थेतील पिके जमीनदोस्त झाली. यातून शेतकरी बांधवांनी कशीबशी आपली पिके वाचवली मात्र पुन्हा ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना फटका बसला. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होणार आहे.

दरम्यान आता खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई काढण्यासाठी शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामासाठी कंबर कसली आहे. मात्र पुन्हा एकदा पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवणार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. आता शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात पाऊस कोसळणार असल्याचे भविष्यवाणी केली आहे.

पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात 24 तारखेपर्यंत हवामान कोरडे राहणार असून थंडीचा जोर वाढणार आहे. मात्र त्यानंतर हवामानात बदल होणार असून महाराष्ट्रात सर्व दूर पावसाची शक्यता आहे. 24 तारखेनंतर महाराष्ट्रात पाऊस कोसळणार असल्याचे पंजाबरावांनी नमूद केले आहे. मात्र पाऊस कोणत्या जिल्ह्यात कोसळेल याबाबत पंजाब रावांनी तूर्तास तरी माहिती दिलेली नाही.

परंतु पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या दोन ते तीन दिवसात 24 तारखेनंतर महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता तयार होणार आहे याबाबत नवीन हवामान अंदाज सार्वजनिक करणार आहेत. निश्चितच पंजाबरावांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस कोसळणार असल्याचे भविष्यवाणी केली असल्याने शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी पंजाबराव जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात एका कार्यक्रमाला आले असता हा हवामान अंदाज त्यांनी शेतकऱ्यांसाठी जारी केला आहे.