Panjabrao Dakh : पंजाबरावांचा हवामान अंदाज ! असं राहणार पुढील 10 दिवसांच हवामान ; वाचा डख यांचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh : गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. हवामान कोरडं आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील काही दिवस हवामान कोरड राहणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान राज्यात आता थंडीचा जोर वाढू लागला आहे. हवामान विभागाने देखील राज्यात थंडीचा जोर अजून वाढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मित्रांनो खरं पाहता आता खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून बहुतांशी ठिकाणी खरीप हंगामातील पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत राज्यात आता रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी शेतीची पूर्व मशागत करत आहेत. निश्चितच राज्यात थंडी वाढत असल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीसाठी याचा फायदा होणार आहे.

मित्रांनो, दरम्यान आपल्या हवामान अंदाज यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चीर परिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांनी आपला सुधारित हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) वर्तवला आहे. पंजाबराव डख यांच्या मते पुढील दहा दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. यामुळे राज्यात शेती कामाला वेग येणार असून रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या करण्यासाठी पोषक वातावरण तयार होईल.

पंजाबराव डख यांच्या मते शेतकरी बांधवांनी गहू तसेच हरभरा पिकांची पेरणी साठी आवश्यक पुर्वमशागत करून घ्यावी. मित्रांनो खरं पाहता वेळेवर गव्हाची पेरणी करण्यासाठी एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर हा कालावधी सर्वोत्कृष्ट असतो. तसेच हरभरा पेरणीसाठी 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर हा कालावधी सर्वोत्कृष्ट असतो. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी शेतीची पूर्व मशागत करून लवकरात लवकर या दोन्ही पिकांची पेरणी करणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.

खरं पाहता यावर्षी पावसाळी काळात समाधानकारक पाऊस झाला असल्याने तसेच परतीचा पाऊस देखील चांगला बरसला असल्याने रब्बी हंगामात पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे चित्र आहे. शिवाय आता राज्यात थंडीचा जोर वाढत असल्याने याचा रब्बी हंगामातील पेरणी केलेल्या पिकांना फायदा होणार आहे.

दरम्यान पंजाबराव यांनी पुढील दहा दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार असल्याचे नमूद केले असल्याने शेतकऱ्यांना निश्चितच याचा फायदा होणार आहे. मित्रांनो खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी बांधवांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. मात्र आता राज्यात रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण बनले आहे. यामुळे खरीप हंगामात झालेले नुकसान शेतकरी बांधवांना रब्बी हंगामातून भरून काढता येणार आहे.