Pea Crop Cultivation: ऑक्टोबरमध्ये करा वाटाण्याच्या ‘या’ 3 सुधारित वाणांची लागवड! मिळेल हेक्टरी 80 ते 100 क्विंटल उत्पादन

ऑक्टोबर महिन्यामध्ये वाटाणा लागवडीतून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर वाटाण्याच्या सुधारित वाणांची लागवड करणे गरजेचे आहे. खासकरून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन या माध्यमातून मिळू शकते व ते विकून चांगला आर्थिक नफा देखील मिळू शकतो.

Ajay Patil
Published:
pea crop

Pea Crop Cultivation:- भारतामध्ये जर वाटाणा लागवड करायची असेल तर त्याचा लागवडीचा सर्वात योग्य कालावधी हा ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यानचा मानला जातो. त्यामुळे आता सप्टेंबर महिना संपायला अवघे पाच ते सहा दिवस बाकी आहेत. त्यामुळे भारतातील बऱ्याच भागांमध्ये शेतकऱ्यांनी वाटाणा लागवडीची तयारी सुरू केली आहे.

जर तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये वाटाणा लागवडीतून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर वाटाण्याच्या सुधारित वाणांची लागवड करणे गरजेचे आहे. खासकरून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन या माध्यमातून मिळू शकते व ते विकून चांगला आर्थिक नफा देखील मिळू शकतो. त्यामुळे या लेखात आपण वाटाण्याच्या तीन सुधारित वानांची माहिती घेणार आहोत  ज्याच्या लागवडीतून उत्तम उत्पादन मिळू शकते.

 या आहेत वाटाण्याच्या तीन सुधारित जाती

1- पुसा 3- शेतकरी बंधू या वाणाची पेरणी ऑक्टोबर महिन्यात करू शकतात. तसे पाहायला गेले तर उत्तर भारतातील शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेले असून  लागवडीच्या नंतर 50 ते 55 दिवसात या जातीचे उत्पादन मिळायला लागते.

वाटाणाच्या या वाणाच्या प्रत्येक शेंगेमध्ये सहा ते सात दाणे असतात व एक एकर शेतात या जातीचा वाटाणा लागवड केली तर वीस ते 21 क्विंटल वाटाण्याचे उत्पादन मिळते.

2- काशी नंदिनी काशी नंदिनी ही वाटाण्याची लवकर परिपक्व होणारी जात असून पेरणी केल्यानंतर केवळ 32 दिवसांनी फुलोरा अवस्थेत येते.तसेच या जातीच्या वाटाण्याच्या झाडाची उंची अंदाजे 47 ते 51 cm पर्यंत असते व एका शेंगेत सात ते आठ वाटाणे असतात.

साधारणपणे 60 ते 65 दिवसात काढणीस तयार होते. जर एक हेक्टर क्षेत्रामध्ये या जातीची लागवड केली तर 110 ते 120 क्विंटल उत्पादन मिळू शकते.

3- आर्केड वाटाणा ऑक्टोबर महिन्यामध्ये वाटाण्याची ही जात देखील लागवडीसाठी खूप फायद्याची असून या लागवडीतून चांगली कमाई होऊ शकते. हा एक युरोपियन जातीचा वाण म्हणून ओळखला जातो व याचे दाणे गोड असतात.

या वाणाच्या वाटाण्याच्या शेंगांची लांबी आठ ते दहा सेंटीमीटर असते व एका शेंगेमध्ये पाच ते सहा वाटाण्याचे दाणे असतात. लागवडीनंतर साधारणपणे 60 ते 65 दिवसात काढणीस तयार होते. जर एका एकरमध्ये या वाणाची लागवड केली तर साधारणपणे 16 ते 18 क्विंटल उत्पादन मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe