मक्याच्या ‘या’ दोन वाणांची लागवड म्हणजेच हेक्टरी मिळते 100 क्विंटल उत्पादनाची हमी! मक्यावरील रोगांना नाही पडत बळी

पोल्ट्री खाद्य उद्योगांमध्ये आणि इथेनॉल निर्मितीकरिता देखील आता मक्याचा वापर होणार असल्यामुळे येणाऱ्या कालावधीत मागणी राहून बाजारभाव देखील चांगला मिळेल अशी एक शक्यता आहे. त्यामुळे मका लागवड शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याची ठरेल.

Ajay Patil
Published:
maize crop variety

Variety Of Maize Crop:- मका हे महत्त्वाचे पीक असून महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. मक्याचे सध्या बाजार भाव देखील चांगल्या पद्धतीने असून शेतकऱ्यांना या माध्यमातून चांगला दिलासा मिळताना दिसून येत आहे.

पशु तसेच पोल्ट्री खाद्य उद्योगांमध्ये आणि इथेनॉल निर्मितीकरिता देखील आता मक्याचा वापर होणार असल्यामुळे येणाऱ्या कालावधीत मागणी राहून बाजारभाव देखील चांगला मिळेल अशी एक शक्यता आहे. त्यामुळे मका लागवड शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याची ठरेल. त्यामुळे तुम्हाला देखील जर रब्बी हंगामामध्ये मका लागवड करायची असेल तर दर्जेदार अशा वरायटींची लागवड करणे तितकेच फायद्याचे असते.

या दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर भारतीय कृषी संशोधन संस्थेने मक्याच्या DMRH 1308 आणि DMRH 1301 या दोन जाती विकसित केल्या असून याच्या लागवडीतून बंपर उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. तसे पाहायला गेले तर ह्या दोन्ही जाती 2018 मध्ये जारी करण्यात आल्या होत्या व तेव्हा त्या अधिसूचित देखील करण्यात आल्या होत्या.

मक्याच्या या दोन्ही जातींनी मक्याचे उत्पादकता वाढवण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.या दोन्ही जातींचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या उच्च उत्पादनक्षमता असणाऱ्या आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणाऱ्या जाती आहेत.

मक्याच्या या दोन्ही जातींचे वैशिष्ट्ये

1-DMRH 1308- मक्याची ही जात रब्बी हंगामात लागवडीकरिता प्रामुख्याने बिहार, राजस्थान तसेच गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांसाठी शिफारस करण्यात आलेली जात आहे. उच्च उत्पादन देणारी ही संकरित मक्याची जात असून रब्बी हंगामात जर लागवड केली तर साधारणपणे 130 ते 150 दिवसांमध्ये काढणीस तयार होतो.

मक्याच्या या वाणाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा आकर्षक दाण्याचा रंग आणि रोगांना प्रतिबंध करणारी क्षमता खूप महत्त्वाची आहे.जर आपण या वाणाची प्रती हेक्टरी उत्पादन क्षमता बघितली तर ती साधारणपणे शंभर क्विंटल पेक्षा जास्त आहे.

2-DMRH 1301- मक्याचा हा वाण 2018 मध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिषा, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये रब्बी हंगामात लागवडीकरिता शिफारस करण्यात आलेला आहे.

हा एक मध्यम कालावधीचा संकरित मक्याचा वाण असून याची रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली आहे व या मक्याच्या दाण्याचा रंग आकर्षक पिवळा असतो. मक्याचा हा वाण देखील उच्च उत्पन्न देणारा असून योग्य व्यवस्थापन जर ठेवले तर या वाणाच्या लागवडीतून प्रती हेक्टरी 100 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe