PM Kisan : पंतप्रधान नरेंद्र मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट ! खात्यात जमा केले 2000 रुपये, तुमच्या खात्यात आले की नाही? असे करा चेक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थेट DBT द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जमा केले आहेत. करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. देशात करोडो अल्पभूधारक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.

महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 वा हप्ता जारी केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बचत गटाच्या महिलांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता DBT द्वारे 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 21 हजार कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहेत.

केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपये दिले जातात. करोडो शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी तीन समान हप्त्यांमध्ये 2000 हजार रुपये दिले जातात.

ई-केवायसी करणे बंधनकारक

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले नाहीत. ई-केवायसी अपडेट जाणून घेण्यासाठी pmkisan-ict@gov.in वर लॉग इन करा. तुम्ही बँकमध्ये जाऊन देखील ई-केवायसी करू शकतात.

पीएम किसानच्या 16व्या हप्त्याचे पैसे खात्यात आले की नाही? असे तपासा

सर्वात प्रथम https://pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
यानंतर होम पेजवर क्लिक करा.
Know Your Status पर्यायावर क्लिक करा.
मोबाईल, आधार, किंवा नोंदणी क्रमांक भरून कॅप्चा भरा.
यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी भरा.
OTP भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही ते समजेल.