शेतकऱ्यांसाठी खुशखबर: ‘या’ योजनेच्या माध्यमातून सरकारी अनुदानाचा लाभ मिळवा आणि घ्या ट्रॅक्टर, वाचा पात्रता,कागदपत्रे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कृषी क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरणाचा शिरकाव झाला पिकाची पूर्व मशागत, आंतर मशागत असो की पिकांची काढणी इत्यादी पर्यंतचे सर्व कामे ही आता यंत्राच्या साह्याने होऊ लागली आहेत. कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरणाला चालना मिळ याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून शासनाच्या अनेक योजनांच्या माध्यमातून यंत्र खरेदीवर अनुदान(Anudaan) दिले जाते. कृषी क्षेत्रातील यंत्रांचा विचार केला तर सगळ्यात जास्त प्रमाणात वापरले जाणारे यंत्र म्हणजे ट्रॅक्टर होय.

शेताची पूर्व मशागती पासून तर पिकांची काढणीनंतर माल बाजारपेठेपर्यंत पोचवण्यासाठी देखील ट्रॅक्टरचा वापर केला जातो. ट्रॅक्टरच्या वापराने अनेक शेतीची कामे वेगात झाल्यामुळे पैसे आणि वेळेत देखील बचत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना उपयुक्त असलेल्या या ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाची पी एम किसान ट्रॅक्टर योजना खूप महत्त्वपूर्ण असून शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान दिले जाते.

 पीएम किसान ट्रॅक्टर(Tractor) योजनेचे स्वरूप

ट्रॅक्टरच्या किमती पाहता प्रत्येक शेतकरी ट्रॅक्टर घेऊ शकेल हे शक्य नाही. कृषी क्षेत्राला चालना देण्याकरिता केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थिती समृद्ध व्हावी याकरिता अनेक योजना आणल्या गेल्या असून त्यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना ही होय. या योजनेच्या माध्यमातून नवीन ट्रॅक्टर खरेदीवर काही राज्यांमध्ये 20% ते 50 टक्क्यांपर्यंत तर काही राज्यांमध्ये 50 टक्के अनुदान देण्यात येते. हे अनुदान राज्य आणि केंद्र सरकार  असे दोन्ही मिळून देते.

 काय आहेत या योजनेचे फायदे?

1- या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात ट्रॅक्टर खरेदीवर 20 ते 50 टक्के अनुदान थेट वर्ग केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे बँक खाते असणे आवश्यक असून त्या खात्याला आधार कार्ड लिंक असणे देखील गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान व 50 टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतः खर्च करावी लागते.

या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी यापूर्वी कोणत्याही कृषी अनुदान योजनेमध्ये समाविष्ट नसावा म्हणजेच त्याने लाभ घेतलेला नसावा. पी एम किसान ट्रॅक्टर योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार(State Government)कडून शेतकऱ्यांना 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते तसेच शेतकऱ्यांना 50 टक्के पर्यंत ट्रॅक्टर कर्ज म्हणून मिळू शकते.

 काय आहे या योजनेची पात्रता?

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अर्जदार हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.

2- अर्जदाराचे वय किमान 18 आणि कमाल 60 वर्ष असावे.

3- अर्जदाराच्या वार्षिक कौटुंबिक आर्थिक उत्पन्न एक लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी असावी.

4- शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे गरजेचे असून शेतकरी या अगोदर इतर कोणत्याही योजनेचा लाभार्थी नसावा.

5- अर्जदाराने अर्ज केल्याच्या पहिल्या सात वर्षापर्यंत कोणत्याही सरकारी योजनेचा, केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

6- एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात येईल.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

1- या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीकडे आधार कार्ड(Adhaar Card), वैध ओळखपत्र जसे की मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन ची आवश्यकता असते.

2- अर्जदाराकडे जमिनीची कायदेशीर कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

3- अर्जदाराकडे बँकेचे स्टेटमेंट तसेच बँक पासबुक असणे गरजेचे आहे.

4- अर्जदार दाराकडे श्रेणी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

5- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो

 अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज

या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्याकरिता पात्रता निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. लागणारे कागदपत्रे घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी अर्थात कॉमन सर्विस सेंटर वर जाऊन अर्ज करू शकतात. यामध्ये लक्षात घेण्याची बाब म्हणजे पी एम किसान ट्रॅक्टर योजने अंतर्गत अर्ज हे जनसेवा केंद्रातच स्वीकारले जात आहेत.

यामध्ये तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जमा करणे गरजेचे असून सीएससी सेंटरवर ऑपरेटर तुमची कागदपत्रे आणि तुमची माहिती याच्या पोर्टलवर ऑनलाईन रेकॉर्ड करेल आणि तुमच्याकडून नाममात्र शुल्क आकारेल. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला अर्जाची पोच पावती दिली जाते. या आधारे तुम्ही  तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकतात. अशा पद्धतीने ही योजना शेतकऱ्यांना खूप फायद्याची ठरू शकते.