भले शाब्बास मोदीजी ! ‘या’ योजनेच्या माध्यमातून गरीब शेतमजुरांना मिळणार दोन लाखांचा लाभ, वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E Shram Card : केंद्र शासनाकडून देशातील गरीब जनतेसाठी कायमच कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या जातात. आता देशातील असंघटित क्षेत्रातील मजुरांना एकत्र जोडण्यासाठी ई-श्रम कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत असंघटित मजुरांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत कामगारांना विम्याचा लाभ देण्यात येतो.

दोन लाख रुपयांचा विमा या अंतर्गत कामगारांना दिला जातो. आता याचा फायदा कसा घ्यायचा तर यासाठी तुम्हाला प्रथम पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. मजुरांव्यतिरिक्त, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि गरीब कुटुंबेही ई-लेबर योजनेअंतर्गत नोंदणी करू शकतात.

या योजनेचा लाभ श्रीमंत वर्गाला दिला जात नाही. या योजनेत नोंदणी कशी करायची आणि तुमच्याकडे कोणती कागदपत्रे असली पाहिजेत याविषयीच आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

ई-श्रम कार्ड कसं काढावं लागेल बरं

हे कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://eshram.gov.in/ या वेबसाईटवर जावं लागणार आहे.

वेबसाईटवर गेल्यानंतर Register on e-shram या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

या ठिकाणी Self Registration या पर्यायात आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. कॅप्चा कोडं कोड प्रविष्ट करायचा आहे.

आपण EPFO आणि ESIC चे सदस्य नाहीत म्हणून त्या ठिकाणी NO या पर्यायावर क्लिक करायच आहे. मग सेंड ओटीपी यावर क्लिक करा.

यानंतर आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल तो ओटीपी दिलेल्या रकान्यात टाकून सबमिट करायच आहे.

पुढे तुमचा आधार क्रमांक टाकावा लागणार आहे. यानंतर एकदा कॅपचा कोड भरायचा आहे. यानंतर I agree to the terms and conditions for registration under e-sram portal यापुढे असलेल्या डब्यात क्लिक करायचा आहे. यानंतर सबमिट करायच आहे. पुढे अजून एक ओटीपी तुम्हाला प्राप्त होईल तो टाकून नबर व्हॅलिडेट करायच आहे.

यानंतर स्क्रीनवर आधार कार्ड वरील संपूर्ण तपशील दिसेल त्याखाली असलेल्या वरच्या सर्व तपशील बरोबर आहे या आशयाचा कॉलम किंवा चौकोन◻️असेल त्यावर क्लिक करायचं आहे. मग Continue to other details या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

आता तुम्हाला वैयक्तिक माहिती भरायची आहे. यानंतर नॉमिनीची माहिती भरायची आहे. मग Save and continue या पर्यायावर क्लिक करायच आहे.

यानंतर तुम्हाला तुमच्या रहिवासीचा संपूर्ण तपशील भरावा लागणार आहे. नंतर पर्मनंट ऍड्रेस टाकायचा आहे. नंतर Save and continue या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

मग तुम्हाला शैक्षणिक माहिती भरावी लागणार आहे. शैक्षणिक माहिती भरल्यानंतर सेव अँड कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे.

यानंतर तुम्हाला तुमच्या व्यवसायाविषयी माहिती भरावी लागणार आहे. व्यवसाय विषयक माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स तिथे नमूद करावे लागणार आहे. बँक डिटेल भरल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू वर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुम्ही भरलेली सर्व माहिती तुमच्या पुढ्यात येईल. भरलेली सर्व माहिती बरोबर आहे असा आशियाचा एक चौकोन वर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

हे सर्व प्रोसेस केल्यानंतर इ श्रम कार्ड स्क्रीनवर दिसेल. यानंतर डाऊनलोड युएएन यावर क्लिक करून तुम्ही ते कार्ड डाऊनलोड करू शकणार आहात.

नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

जर तुम्ही ई-लेबर कार्डसाठी नोंदणी करणार असाल तर तुम्हाला आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.  जर हा दस्तऐवज नसेल तर तुम्ही या पोर्टलवर नोंदणी करू शकणार नाही.

ई-श्रम योजनेचे फायदे

सर्व मजूर आणि शेतकरी यांना सरकारी योजनांचा लाभ एकाच व्यासपीठावर मिळावा या उद्देशाने ई-श्रम पोर्टल सुरू करण्यात आले. या योजनेअंतर्गत सरकार 2 लाख रुपयांचा अपघात विमा देते. यासोबतच काही मजुरांना हप्त्याच्या स्वरूपात आर्थिक मदतही दिली जाते. मात्र, या पोर्टलवर भविष्यात सरकारकडून कोणतीही योजना सुरू झाल्यास त्याअंतर्गत सर्वांना लाभ दिला जाईल.

ई-श्रम योजनेचा लाभ कोणाला मिळेल

फेरीवाले, भाजी विक्रेते, घरकामगार, अल्पकाळ काम करणारे युवक, इतर मजूर, भूमिहीन शेतमजूर आणि विद्यार्थी यांच्यासोबतच या पोर्टलवर नोंदणी करता येईल. जर कोणी कर भरला तर तो ई-लेबर कार्डसाठी अर्ज करू शकत नाही.