Potato Variety : बटाटा लागवड करायची का? मग ‘या’ जातीची लागवड करा, अधिक उत्पादन मिळणार

Potato Variety : अलीकडे भारतात भाजीपालावरील पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाऊ लागली आहे. आपल्या राज्यातही भाजीपाला पिके उत्पादित होतात. यामध्ये बटाटा या पिकाचा देखील समावेश होतो. याची शेती प्रामुख्याने रब्बी हंगामात होत असली तरी बारा महिने या पिकाची लागवड केली जाते.

खरं पाहता हे एक नगदी पीक म्हणून ओळखलं जातं. यामुळे याची लागवड दिवसेंदिवस वाढत आहे. जाणकार लोक देखील बटाटा पिकातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होऊ शकते असं सांगतात. मात्र असे असले तरी या पिकातून अधिकचे उत्पादन मिळवण्यासाठी याच्या सुधारित जातींची शेती करणे अधिक योग्य आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशा परिस्थितीत आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी बटाटा पिकाच्या सुधारित जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

बटाट्याच्या सुधारित जाती खालीलप्रमाणे :-

कुफरी गंगा :- भारतात उत्पादित केले जाणारी ही एक सुधारित बटाट्याची जात आहे. या जातीची विशेषता म्हणजे कमी कालावधीत अधिक उत्पादन मिळणे. जाणकार लोकांच्या मते ही जात मात्र 75 दिवसात 300 क्विंटल हेक्टरी एवढ उत्पादन देण्यास सक्षम आहे. साहजिकच या जातीच्या शेतीतून बटाटा उत्पादकांना मोठा फायदा होणार आहे.

कुफरी निळकंठ :- ही देखील भारतात उत्पादित केली जाणारी एक प्रमुख बटाट्याची जात आहे. या जातीची विशेषता म्हणजे या जातीचा रंग हा इतर बटाट्याच्या जातीपेक्षा वेगळा आहे. या जातीच्या बटाट्याचा रंग हा गडद जांभळा काळा असतो. या जातीपासून हेक्‍टरी 400 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो. शिवाय या जातीच्या बटाट्यात औषधी गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळत असल्याने या जातीला बाजारात मोठी मागणी असते आणि चांगला दर मिळतो. निश्चित या जातीच्या बटाटा पिकातून शेतकऱ्यांना अधिक कमाई होणार आहे.

कुफरी मोहन :- वर नमूद केलेल्या दोन जातीप्रमाणे ही देखील बटाट्याची एक प्रगत जात आहे. या जातीची भारत वर्षात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. ही जात मध्यम कालावधीत काढण्यासाठी तयार होते. जाणकार लोकांच्या मते या जातीच्या बटाटा पिकातून 100 दिवसात 400 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकत.