Custard Apple Processing Business :- विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आणि बहुतेक शेती पिकांचे घसरलेले बाजारभाव यामुळे शेतकरी चहूबाजूने घेरले गेले असून खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
रक्ताचे पाणी करून शेतकरी विविध प्रकारचा शेतीमाल शेतामध्ये पिकवतात. परंतु हातात उत्पन्न येईल तेव्हाच अवकाळी पाऊस किंवा गारपीट, वादळी वारे,दुष्काळ सारख्या नैसर्गिक आपदांमुळे हातात आलेले उत्पन्न वाया जाते. दुसरी बाब म्हणजे उत्पन्न हातात आल्यावर देखील बाजारभाव कसा मिळेल याबाबत कुठल्याही प्रकारची शाश्वती नसते.
बाजार भाव घसरल्यामुळे देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. या सगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता प्रक्रिया उद्योगाकडे वळणे काळाची गरज आहे.
नको त्या बाजारभावात शेतीमाल विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून त्याला बाजारपेठेत विकल्यावर अधिकचा नफा मिळवणे या दृष्टिकोनातून काम करणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर प्रक्रिया उद्योगांसाठी शासनाच्या माध्यमातून देखील अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते.
या मुद्द्याला धरून जर आपण बीड जिल्ह्याचा उदाहरण दाखल विचार केला तर सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचे आता सीताफळ प्रक्रिया उद्योगासाठी निवड करण्यात आलेली असून चार सीताफळ प्रक्रिया उद्योग सुरू देखील झालेले आहेत. नेमके सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत प्रक्रिया उद्योगांसाठी कशा प्रकारचे अनुदान दिले जाते याबद्दलची माहिती घेऊ.
सिताफळ प्रक्रिया उद्योगासाठी बीड जिल्ह्याची निवड
केंद्र सरकारच्या सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांतर्गत बीड जिल्ह्याची सीताफळ प्रक्रिया उद्योगाकरिता निवड करण्यात आलेली असून त्या ठिकाणी चार सिताफळ प्रक्रिया उद्योग सुरू देखील करण्यात आलेले आहे. याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून 35 टक्के अनुदान देण्यात येत असून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते जमा देखील केले जात आहे.
या योजनेचा जास्तीत जास्त फायदा मिळावा याकरिता या योजनेसाठी शिक्षणाची मर्यादा देखील कमीत कमी ठेवण्यात आली आहे. म्हणजे तुम्ही अगदी आठवी उत्तीर्ण असाल तरी देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकातून उद्योजक निर्माण व्हावे व रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून ही योजना राबवली जात आहे. बीड जिल्ह्यासाठी 250 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आलेले असून आत्तापर्यंत जिल्ह्यातील 56 लाभार्थ्यांची याअंतर्गत उद्योगांची सुरुवात केलेली आहे.
सिताफळ प्रक्रिया उद्योगासाठी असा करा अर्ज
सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगातून लाभार्थी वाढावेत याकरिता जास्तीत जास्त अर्ज करण्यासाठी कृषी अधिकारी कार्यालय मार्फत आवाहन देखील करण्यात येत असून बीड जिल्ह्याचा विचार केला तर त्या ठिकाणी सीताफळ प्रक्रिये करिता आतापर्यंत चारच लाभार्थी पात्र ठरले आहेत. या योजनेच्या माध्यमातून उद्योग सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून 35 टक्के अनुदान मिळत आहे.
काय आहे सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना?
या अंतर्गत देशांमध्ये अन्नप्रक्रिया उद्योगांकरिता जे काही अनुकूल पिके आहेत त्यांची जिल्ह्यानुसार विभागणी करण्यात आलेली असून या अंतर्गत बीड जिल्ह्यासाठी सिताफळ फळाची निवड करण्यात आलेली आहे.
नवउद्योजक उभे राहावेत रोजगार निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागातील गरीब महिला लाभार्थ्यापासून दहा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या अर्जदाराला देखील लाभ घेता येणार आहे. शिक्षण आठवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच दोन फोटो, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक व जागेचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांच्या आधारित अर्ज करता येणार आहे.