Rabi Crop Seed Subsidy: रब्बी हंगामामध्ये हरभरा बियाण्यावर मिळत आहे ‘इतके’ अनुदान? असा करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rabi Crop Seed Subsidy:- सध्या रब्बी हंगाम सुरू झालेला असून यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकरी बंधू पिकांचे नियोजन करताना दिसून येत आहे. रब्बी हंगामामध्ये प्रामुख्याने हरभरा तसेच ज्वारी, मका, गहू, कांदा इत्यादी पिकांची लागवड केली जाते.

या रबी हंगामातील पिकांपैकी जर आपण ज्वारी आणि हरभरा या पिकांचा विचार केला तर महाबीज च्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत असलेल्या रब्बी हंगामाकरिता कडधान्य योजनेच्या माध्यमातून हरभरा व ज्वारीच्या बियाण्यावर अनुदान देण्यात येत आहे.यावरकिती अनुदान देण्यात येत आहे व त्यासाठी नेमक्या काय अटी आहेत? इत्यादी बद्दल महत्त्वाची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 हरभरा बियाण्यावर महाबीजकडून मिळत आहे अनुदान

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून रब्बी हंगामाकरिता कडधान्य योजनेअंतर्गत दहा वर्षाच्या आतील व दहा वर्षावरील हरभरा बियाणे महाबीजकडून आता अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये या योजनेअंतर्गत दहा वर्षाच्या आतील हरभऱ्याचे बियाणे 3294 रुपये क्विंटल तर दहा वर्षांवरील 1108 क्विंटल बियाणे महाबीज कडून शेतकऱ्यांकरिता उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

यामध्ये वानांचा विचार केला तर दहा वर्षाच्या आतमध्ये फुले विक्रम, फुले विक्रांत, एकीजी 1109, बीजीएम 10216 या हरभऱ्याच्या वाणाच्या बियाण्यांची 20 किलोच्या बॅगेची किंमत 1700 रुपये प्रति बॅग आहे. यावर पाचशे रुपयांचे अनुदान मिळणार असून बॅग 1200 रुपयांना शेतकऱ्यांना मिळणार आहे.

तसेच दहा वर्षांवरील बियाण्याचा विचार केला तर यामध्ये विजय दिग्विजय या वाणाची बॅग 20 किलोची असून तिची किंमत 1540 रुपये आहे व यावर 300 रुपयांच्या अनुदान मिळणार आहे. त्यामुळे ही बॅग शेतकऱ्यांना 1240 रुपयांना मिळणार असून ती महाबीजचे विक्रेते व उपविक्रेत्यांकडे उपलब्ध करण्यात येणार आहे.

 अनुदानाचा लाभ घेण्याकरित ही कागदपत्रे लागतात

अनुदानित हरभरा बियाणे हे शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावरील जे काही क्षेत्र आहे त्यानुसार मिळणार असून कमाल पाच एकर करिता पाच बॅगेपर्यंत खरेदी शेतकऱ्यांना करता येणार आहे. जे शेतकरी याकरिता ऑनलाईन अर्ज करतील अशा शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक अथवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून परमिट घेणे गरजेचे असून ते परमिट घेऊन व इतर शेतकऱ्यांनी सातबारा व आधार कार्डची झेरॉक्स प्रत देऊन हे अनुदानित बियाणे खरेदी करण्याचे आव्हान देखील जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. याकरिता महाडीबीटी पोर्टलवर जेव्हा शेतकरी अर्ज करतील तेव्हा ज्या शेतकऱ्यांची निवड होईल त्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून परमिट देण्यात येणार असून त्यानंतरच कृषी निविष्ठा विक्रेता दुकानातून बियाणे मिळणार आहे.