बातमी कामाची ! रब्बी पिक विमा अर्ज प्रक्रिया सुरु ; शेतकऱ्यांनो तुमच्या मोबाईलवर ‘या’ पद्धतीने दोन मिनिटात भरा रब्बी पिक विमा ; स्वतः अर्ज करण्याची प्रोसेस पहा

Rabi Pik Vima 2022 : शेतकरी बांधवांसाठी अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. रब्बी हंगामासाठी पिक विमा ची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पिक विमा च्या माध्यमातून नुकसान भरपाई दिली जात असते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यासाठी शेतकरी बांधवांना पिकाचा विमा उतरवावा लागतो. यासाठी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम प्रीमियम म्हणून भरावी लागते. पिक विमा हा खरीप आणि रब्बी हंगामासाठी असतो.

खरीप हंगामातील पिक विमा वाटप सुरू असून आता रब्बी हंगामातील पिक विमा साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण सीएससी सेंटर वर न जाता शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने रब्बी हंगामासाठी पिक विमा अर्ज सादर करता येऊ शकतो याविषयी जाणून घेणार आहोत.

Advertisement

खरं पाहता पिक विमा भरण्यासाठी किंवा अर्ज सादर करण्यासाठी शेतकरी बांधवांना सीएससी सेंटर वर जावे लागते. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ जातो, शिवाय शेतकरी बांधवांना तासंतास रांगेत उभे राहावे लागते. अशा परिस्थितीत जर शेतकरी बांधवांकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर असे शेतकरी बांधव आपल्या मोबाईलच्या सहाय्याने ऑनलाइन पद्धतीने रब्बी हंगामातील पिक विमा अर्ज सहज सादर करू शकणार आहेत.

यासाठी शेतकरी बांधवांना ऑनलाइन पेमेंट देखील करावे लागते. इंटरनेट बँकिंग, यूपीआय, क्रेडिट कार्ड या ऑप्शनच्या मदतीने शेतकरी बांधवांना आपला प्रीमियम भरता येणे शक्य होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया रब्बी हंगामासाठी कशा पद्धतीने पिक विमा अर्ज सादर करायचा.

सर्व प्रथम पिक विमा अर्ज सादर करताना लागणारी कागदपत्रे :-

Advertisement

आधार कार्ड.

बँक पासबुक.

सातबारा.

Advertisement

एकूण जमिनीचा दाखला (८ अ).

पिक पेरा स्वयं घोषणापत्र.

वर नमूद केलेले सर्व कागदपत्रे तुमच्याकडे आहेत. मात्र पीक पेरा स्वयं घोषणापत्र तुमच्याकडे कदाचित नसेल तर चिंता करू नका यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. लिंक वर पीडीएफ मध्ये पिक पेरा स्वयंघोषणापत्र देण्यात आले आहे.

Advertisement

पीक पेरा स्वयंघोषणापत्र इथे क्लिक करा

मित्रांनो वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे घेऊन शेतकरी बांधव एकतर सीएससी सेंटरवर जाऊन रब्बी हंगामासाठी पिक विमा अर्ज सादर करू शकतात किंवा स्वतः वैयक्तिक पिक विमा अर्ज सादर करू शकणार आहेत. आज आपण शेतकरी बांधव स्वतः कशा पद्धतीने पिक विमा अर्ज करू शकतात याविषयी जाणून घेणार आहोत.

रब्बी हंगामासाठी पिक विमा अर्ज स्वतः सादर करण्याची पद्धत

Advertisement

विमा अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम शेतकरी बांधवांना मोबाईलच्या गुगल सर्चमध्ये pmfby हा शब्द टाकावा लागेल आणि सर्च करावे लागेल.

यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर प्रधान मंत्री फसल बिमा योजना हि वेबसाईट ओपन होणार आहे.

या वेबसाईटवर शेतकऱ्यांना farmers corner हा पर्याय शोधायचा आहे.

Advertisement

यानंतर मोबाईल नंबर टाकून opt मिळवायचा आहे, आलेला otp दिलेल्या चौकटीमध्ये टाकावा लागेल.

आधार नंबर टाईप करून आणि त्यावर आलेला otp दिलेल्या चौकटीत टाका.

दोन्ही otp टाकल्यानंतर शेतकरी लॉगीन झालेला असेल. आता संपूर्ण माहिती व्यवस्थित टाका आणि अर्ज सादर करून टाका.

Advertisement