Wheat Farming : रब्बी हंगाम झाला सुरु…! नोव्हेंबरमध्ये ‘या’वेळी गव्हाची अशा पद्धतीने पेरणी करा ; मिळवा दर्जेदार उत्पादन

Wheat Farming : देशात रब्बी हंगाम सुरू झाला आहे. रब्बी हंगामासाठी आवश्यक खतांची तसेच बी बियाणांची पूर्तता करण्यासाठी शेतकरी बांधव लगबग करत असल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांशी ठिकाणी खरीप हंगामातील मका सोयाबीन या पिकांची काढणी प्रगतीपथावर आहे. अनेक ठिकाणी खरीप हंगामातील पिकांची काढणी केल्यानंतर लगेचच मळणीची कामे केले जात आहेत.

मळणी केल्यानंतर शेतकरी बांधव ताबडतोब शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवत आहेत जेणेकरून त्यांना रब्बी हंगामासाठी आवश्यक भांडवलाची उभारणी करता येणे शक्य होईल. मित्रांनो रब्बी हंगामात आपल्या देशात वेगवेगळ्या पिकांची शेती केली जाते यामध्ये गहू हरभरा मोहरी यांसारख्या पिकांचा समावेश होतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आपल्या महाराष्ट्रात देखील या तिन्ही पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. आज आपण गहू या पिकाच्या शेतीमधील काही महत्त्वाच्या बाबी थोडक्यात जाणून घेणार आहोत. मित्रांनो रबी हंगामात शेतकरी बांधव या पिकातून निश्चितच चांगली कमाई करू शकणार आहेत. मात्र यासाठी शेतकऱ्यांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.

गव्हाच्या शेतीमधील काही महत्वाच्या बाबी
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, गहू हे भारतातील रब्बी हंगामात पेरल्या जाणाऱ्या मुख्य पिकांपैकी एक आहे. गव्हाचा वापर प्रामुख्याने मानवी आहारात विशेषता चपाती बनवण्यासाठी केला जातो. गव्हात प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे याचे सेवन मानवी आरोग्याला फायद्याचे ठरते. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा ही भारतातील मुख्य गहू उत्पादक राज्ये आहेत. मात्र असे असले तरी आपल्या राज्यात देखील मोठ्या प्रमाणात गव्हाची शेती केली जाते. मात्र गहू पिकातुन अधिक उत्पादन घेण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत आज आपण कोणत्या गोष्टीची काळजी गहू लागवडीत शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत.

मित्रांनो कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, गव्हाच्या पेरणीसाठी योग्य वेळ मध्य ऑक्टोबर ते नोव्हेंबर यादरम्यान असतो.
तसेच शेतकऱ्यांनी गहू पिकातुन चांगले उत्पादन घेण्यासाठी सुधारित जातींचे बियाणे वापरले पाहिजे. सुधारित जातींची बियाणे वापरल्यास शेतकरी बांधवांना गव्हाच्या पिकातून चांगले उत्पादन मिळणार आहे. वाचा सुधारित जातींमध्ये करण नरेंद्र, करण वंदना, पुसा यशस्वी, करण श्रिया आणि डीडीडब्ल्यू 47 या गव्हाच्या सुधारित जाती आहेत.
कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, गव्हाच्या पेरणीच्या वेळी कमी तापमान आणि पिकाच्या परिपक्वतेच्या वेळी कोरडे आणि उबदार वातावरण आवश्यक असते.
गव्हाची लागवड करताना चिकणमाती असलेली जमीन उत्तम पीक उत्पादनासाठी उत्तम मानली जाते. मातीचे pH मूल्य 6 ते 8 असावे.
गव्हाची लागवड करताना पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासणे आवश्यक असते, जर गव्हाच्या बियाण्यावर प्रक्रिया केली नाही तर पेरणीपूर्वी बियाण्यावर बुरशीनाशकाची प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
गहू पिकातुन चांगले उत्पादन घेण्यासाठी खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा लागणार आहे.
गहू पिकाच्या पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिले पाणी द्यावे. जाणकार लोकांच्या मते, गहू पिकाला 3 ते 4 सिंचनाची गरज असते.
पिकातील तणांचे नियंत्रण करण्यासाठी वेळोवेळी तण काढणे आवश्यक असते. तसेच तण नियंत्रित करण्यासाठी शेतकरी बांधव तणनाशकांची फवारणी देखील करू शकतात.