माती परीक्षण करून घेणे हे अनेक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बाब आहे. माती परीक्षण करून घेतल्यामुळे मातीत उपलब्ध असलेले पोषक घटक आणि कोणत्या पोषक घटकांची कमतरता आहे हे आपल्याला पटकन कळते व त्यानुसार पिकांकरिता खत नियोजन करणे सोपे होते.
म्हणजेच शेतकऱ्यांना योग्य त्या प्रमाणामध्येच रासायनिक खतांचा वापर यामुळे करता येतो व बेसुमार खतांचा वापर करून खतांवरील खर्च देखील वाचतो व पीक उत्पादन वाढीसाठी देखील याचा खूप मोठा फायदा होतो.
परंतु माती परीक्षण जर करायचे असेल तर नेमके कुठे करावे? हा एक महत्वपूर्ण प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडत असेल. ज्यामुळे या लेखामध्ये आपण कोणत्या जिल्ह्यात माती परीक्षण प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी आहेत याबाबतची महत्त्वाची माहिती बघू.
कोणत्या जिल्ह्यात कुठे आहे माती परीक्षण किंवा माती सर्वेक्षण प्रयोगशाळा?
1- बुलढाणा जिल्हा– बुलढाणा जिल्ह्यामध्ये माती सर्वेक्षण प्रयोगशाळा ही कृषी विज्ञान केंद्राची माती परीक्षण प्रयोगशाळा आणि जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्रातील माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळा आहे.
2- अमरावती जिल्हा– अमरावती जिल्ह्यामध्ये घाटखेड येथील कृषी विज्ञान केंद्राची माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळा असून त्यासोबतच दुर्गापूर येथील कृषी विज्ञान केंद्राची माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळा देखील आहे.
3- नाशिक जिल्हा– नाशिक जिल्ह्यातील कृषी महाविद्यालय मालेगाव येथील प्रयोगशाळा आणि कृषी विज्ञान केंद्र येथील प्रयोग शाळेत माती परीक्षण सुविधा उपलब्ध आहे.
4- बीड जिल्हा– बीड जिल्ह्यातील श्री छत्रपती शाहू फुले आंबेडकर कॉलेज ऑफ कृषी येथील माती परीक्षण प्रयोगशाळा तसेच जिल्हा माती सर्वेक्षण आणि माती परीक्षण प्रयोगशाळा या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे.
5- अकोला जिल्हा– अकोला जिल्ह्यातील जिल्हा माती सर्वेक्षण आणि माती परीक्षण कार्यालय येथे माती परीक्षण करता येईल.
6- पुणे जिल्हा– पुणे जिल्ह्यात जिल्हा माती सर्वेक्षण आणि माती परीक्षण प्रयोगशाळा आहे.
7- यवतमाळ जिल्हा– यवतमाळ जिल्ह्यात देखील जिल्हा माती परीक्षण आणि माती सर्वेक्षण कार्यालय आहे.
8- हिंगोली जिल्हा– हिंगोली जिल्ह्यात तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रातील माती परीक्षण प्रयोग शाळेत माती परीक्षण करता येईल.
9- नांदेड जिल्हा– नांदेड जिल्ह्यातील पोखरणी येथील कृषी विज्ञान केंद्रातील माती परीक्षण प्रयोगशाळेत ही सुविधा उपलब्ध आहे.
10- सोलापूर जिल्हा– सोलापूर जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्रातील माती परीक्षण प्रयोगशाळेत ही सुविधा उपलब्ध आहे.
11- रायगड जिल्हा– रायगड जिल्ह्यातील रोहा येथील कृषी विज्ञान केंद्रातील माती परीक्षण प्रयोगशाळेत माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.
12- धुळे जिल्हा– धुळे जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रातील माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळेत माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.
13- अहमदनगर जिल्हा– अहमदनगर येथील कृषी विज्ञान केंद्र दहिगाव येथील माती परीक्षण शाळेत माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.
14- परभणी जिल्हा– परभणी जिल्ह्यात परभणी कृषी विज्ञान केंद्र येथील माती परीक्षण प्रयोगशाळेत ही सुविधा उपलब्ध आहे.
तसेच त्या त्या जिल्ह्यांमध्ये खाजगी माती परीक्षण प्रयोगशाळा देखील माती परीक्षण करिता कार्यरत असून यासोबतच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा माती परीक्षण प्रयोगशाळा देखील कार्यरत आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांना काही नाममात्र शुल्क देऊन माती परीक्षण करता येऊ शकते.