Mangoes Variety:- सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असल्यामुळे विविध प्रकारच्या फळांच्या मागणीमध्ये प्रचंड प्रमाणात या कालावधीत वाढ होते. कारण नकोशा असलेल्या उकाड्यापासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या फळांची ज्यूस पिण्यावर या कालावधीत मोठ्या प्रमाणावर भर दिला जातो व त्यामुळे मागणी देखील वाढते.
या कालावधीमध्ये मागणी असलेल्या फळांमध्ये आंब्याला जास्त मागणी असते. तसेच या कालावधीत बऱ्याच घरांमध्ये आमरसाचा बेत आखला जातो. त्यामुळे आंब्याला मागणी खूप जास्त असते. या अनुषंगाने जर आपण आंब्याच्या प्रजाती बघितल्या तर बाजारामध्ये अनेक प्रजातींचे आंबे विक्रीला येतात.
परंतु आंब्याच्या प्रजातीमध्ये आपल्या डोळ्यासमोर अगोदर येते ते सगळ्यांची आवडती म्हणजे कोकणी हापूस आंबा होय. हापूस आंबा हा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. परंतु या हापूस आंब्या व्यतिरिक्त भारतामध्ये आंब्याच्या अशा काही प्रजाती आहेत जे हापूस आंब्याला देखील तोडीस तोड आहेत. त्यामुळे या लेखात आपण भारतातील टॉप 10 आंब्याच्या प्रजाती आणि त्यांची वैशिष्ट्य बघणार आहोत.
भारतातील टॉप आंब्याच्या प्रजाती आणि त्यांची वैशिष्ट्ये
1- केसर आंबा– या प्रजातीच्या आंब्याचा रंग हा भगवा असतो व खायला देखील खूप गोड असतो. केसर आंब्याला आंब्याची राणी म्हणून संबोधले जाते. हापूसनंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा हा सर्वात लोकप्रिय असा आंबा असून त्याचा आकार अंडाकृती आणि मध्यम असतो. तुम्हाला जर केसर आंबा ओळखायचा असेल तर तुम्ही त्यावर असलेले पातळ सोनेरी पिवळ्या रंग आणि लालसरपणाने ओळखू शकतात. तसेच या आंब्याची आतून साल ही रसाळ आणि गुळगुळीत लालसर केसरी असते.
2- तोतापुरी आंबा– तोतापुरी आंब्याला बंगनापल्ली या नावाने देखील ओळखले जाते. या आंब्याचा आकार हा पोपटाच्या चोचीसारखा आणि रंग हिरवा असतो म्हणूनच त्याला तोतापुरी हे नाव. तोतापुरी आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे या आंब्याची चव ही आंबट गोड स्वरूपाची असते. आंबा लाल रंगाचा असतो व भारतातील आंध्र प्रदेश,
कर्नाटक, बेंगलोर आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. कच्चा तोतापुरी आंब्याचा वापर हा लोणचे आणि चटणी बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच आंब्यांवरील प्रक्रिया उद्योगांमध्ये तोतापुरी आंबा वापरला जातो.
3- लंगडा आंबा– आंब्याची ही प्रजात प्रामुख्याने उत्तर प्रदेश राज्यातील बनारस येथील असून या प्रजातीचा आंबा हा अतिशय गोड व रसाळ असतो. लंगडा आंब्याची वैशिष्ट्य म्हणजे हा तुम्ही चुकून खाऊ शकत नाहीत. या आंब्याची साल अतिशय पातळ असते व त्यामुळे केळी प्रमाणे ती सहज सोलून काढता येते.
4- दशेरी आंबा– उत्तर भारतामध्ये या आंब्याला दशहरी तर महाराष्ट्रात दशेरी या नावाने ओळखले जाते. आंब्याची ही जात उत्तर भारतामध्ये खूप प्रसिद्ध असून हा आंबा लांबट आकाराचा असतो. दशहरी आंब्याची चव इतर जातींच्या आंब्या पेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये गोड असते व त्यामुळे हा जास्त प्रमाणात खाल्ला जात नाही. लागवडीनंतर साधारणपणे एक वर्षांमध्ये याला फळ यायला लागतात.
5- चौसा आंबा– चौसा आंबा प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहार मधील आहे. भारतातच नाहीतर पाकिस्तान मध्ये देखील याचे उत्पादन घेतले जाते. आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे याचा आकार मूत्रपिंडाच्या आकाराचा असतो. चौसा आंबा हा काहीसा आंबट आणि गोड असतो तसेच हा चोखून खाता येत नाही. त्याला कापूनच खाता येते.
6- किसन भोग आंबा– आंब्याची ही जात पश्चिम बंगाल व बिहार राज्यांमध्ये सर्वात प्रसिद्ध प्रजातींपैकी एक आहे. या आंब्याच्या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे याची चव मधासारखी लागते. किसन भोग आंब्याची लागवड प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या मध्ये केली जाते व हा मोठ्या आकाराचा आंबा असून त्याची साल नाजूक असते. आकाराने हा आंबा खूप मोठा असतो व एका आंब्याचे वजन साधारणपणे 300 ते 400 ग्राम असते.
7- बॉम्बे ग्रीन आंबा– यालाच आपण कैरी म्हणून देखील ओळखतो. या आंब्याचा वापर लोणची आणि इतर महत्त्वाच्या पाककृती करण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. हा आंबा पिकलेला आणि हिरवा नसताना कापणी केलेल्या आंब्याची एक प्रजात आहे.
या आंब्याचा आकार इतर आंब्याच्या तुलनेमध्ये लहान आणि गोलसर तसेच फुगीर असते.याचे उत्पादन महाराष्ट्र आणि गुजरात व त्यासोबत आंध्र प्रदेश राज्यात घेतले जाते व एप्रिल ते जून महिन्यात होते. याची चव आंबट तुरट असते व कडक आंब्यामध्ये मोठा गर असतो व याचा वापर लोणचे बनवण्यासाठी केला जातो.
8- नीलम आंबा– या आंब्याचे उत्पादन प्रामुख्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांमध्ये घेतले जाते. या आंब्याचे नीलम हे नाव पाकिस्तानच्या नीलम नदीवरून आले आहे व या ठिकाणी भरपूर प्रमाणात या आंब्याची लागवड केली जाते. इतरांच्या तुलनेमध्ये नीलम प्रजातीचे आंबे गोड आणि सुगंधी असतात व आकाराने लहान असतात. या प्रजातीच्या आंब्याचा रंग हा नारंगी असतो.