Rice Farming: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणारचं…! भाताची ‘ही’ देशी जात रोवणी करा, लाखों नव्हे करोडो कमवा; वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rice Farming: देशातील मान्सूनचा (Monsoon) प्रवास यावर्षी खूपच कासवगतीने सुरू आहे. शिवाय मान्सून खूपचं कमकुवत आहे आणि देशातील बहुतांशी ठिकाणी कमी पाऊस झाला आहे. अशा परिस्थितीत देशात खरीप हंगामातील (Kharif Season) मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भात पिकाच्या रोवणीला (Paddy Farming) उशीर होत असल्याचे चित्र संपूर्ण देशात आहे.

महाराष्ट्रात देखील भातशेती (Rice Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीत भातशेती सर्वाधिक बघायला मिळते. अशा परिस्थितीत राज्यातील कोकण किनारपट्टीत देखील या वर्षी भातशेती उशिराने होत असल्याचे चित्र आहे.

अशा परिस्थितीत कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी भात उत्पादक शेतकऱ्यांना (Rice Grower Farmer) यावेळी मोलाचे मार्गदर्शन देतांना सांगितले की, शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या भाताची रोवणी करावी, जे कमी वेळात आणि कमी कष्टात चांगले उत्पादन देऊ शकतील. 

यासाठी कृषी तज्ञ धानाचे पुसा बासमती-1509, पुसा बासमती-1692, पुसा बासमती 1612, पुसा बासमती-1121, पुसा बासमती-1401 सारख्या वाणांपासून थेट पेरणीची शिफारस करत आहेत. धानाच्या या जातींपैकी (rice variety) एक उत्तम प्रकार म्हणजे पुसा बासमती-1692 जे कमी कालावधीचे पीक आहे आणि 115 दिवसांत उत्पादन देण्यास तयार होत असल्याचा दावा केला जातो.

पुसा बासमती 1692

•पुसा बासमती 1692 ही भाताची सर्वोत्कृष्ट देशी जात म्हणून ओळखली जाते, ज्याचा पेंढा लांब असतो आणि दाणे सुगंधी असतात.

•भाताची ही जात एक हेक्टर जमिनीत 27 क्विंटलपर्यंत चांगल्या प्रतीचे उत्पादन देत असल्याचा दावा केला जातो.

•ही जात लवकरच काढणीसाठी तयार होणारी जात असून मजबूत आणि रोग प्रतिरोधक आहे.

•याच्या तांदळाचा दर्जाही उत्तम असल्याचे सांगतात. या वाणापासून उत्पादित केलेला तांदूळ सहज तुटत नाही.

•शेतकऱ्यांची इच्छा असेल तर ते या वाणाची शेती करून ते उभे भाताचे उत्पादन 50 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात.

•इतर तांदळाच्या वाणांच्या तुलनेत पुसा बासमती तांदूळ अधिक दरात विकला जात असल्याने शेतकऱ्यांनाही यातून चांगला नफा मिळत असल्याचे सांगितले जाते.

•मात्र, पुसा बासमती 1692 बियाणांची बाजारात किंमत थोडी जास्त आहे, त्यामुळेच त्याच्या उत्पादनाच्या दुप्पट भाव मिळतो.

•जून 2020 मध्ये तयार केलेली ही देशी धानाची जात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा एक मार्ग आहे.

•पुसा बासमती 1692 ची सेंद्रिय पद्धतीने लागवड केल्यास भाताचे अधिक उत्पादन मिळते.

•आता कृषी तज्ज्ञ बासमती भात पिकाच्या पोषणासाठी रसायनांच्या जागी जीवामृत आणि अझोला वापरण्याची शिफारस करतात.

निश्चितच खरीप हंगामात शेतकरी बांधव धानाच्या या जातीची शेती करून लाखों रुपये उत्पन्न कमवू शकणार आहेत. भात उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या भागातील हवामानानुसार तज्ञ लोकांच्या सल्ल्यानेचं भाताच्या जातीची निवड करावी.