Shimla Mirchi Lagwad: शिमला मिरचीच्या ‘या’ वाणांची कराल लागवड तर एकाच वर्षात व्हाल कर्जमुक्त! वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shimla Mirchi Lagwad:- सध्या परंपरागत शेती पद्धत आणि परंपरागत पिके कालाच्या ओघात मागे पडले असून आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या पिकांची लागवड करताना आपल्याला दिसून येतात. तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक प्रकारची भाजीपाला पिके, फळबागा लागवड आणि इतर पिकांच्या माध्यमातून शेतकरी बंपर उत्पादन मिळवताना दिसून येत आहेत.

त्यातल्या त्यात शेडनेट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर फुल पिके व भाजीपाला पिकांची लागवड करतात व या शेडनेटमध्ये शिमला मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. शिमला मिरची लागवडीच्या अनुषंगाने पाहिले तर या मिरचीला काय मागणी असते

व ती वर्षभर 50 ते 60 रुपये प्रति किलो दराने साधारणपणे विकली जात असते. त्यामुळे शिमला मिरचीची लागवड शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या खूप फायद्याची ठरू शकते. परंतु तुम्हाला देखील शिमला मिरचीची लागवड करायची असेल तर मात्र त्याकरिता तुम्हाला त्या मिरचीच्या सर्वात उत्तम अशा वाणाची निवड करणे गरजेचे आहे. त्यामुळे या लेखामध्ये आपण शिमला मिरचीचे सगळ्यात चांगले वाण कोणते त्यांची माहिती घेऊ.

 हे आहेत शिमला मिरचीचे सर्वात जास्त उत्पादन देणारे वाण

1- सोलन हायब्रीड 2- शिमला मिरचीचे हे वाण भरपूर उत्पादनासाठी प्रामुख्याने ओळखले जाते. हे एक संकरित वाण असून या वाणाच्या लागवडीनंतर साधारणपणे पीक 60 ते 70 दिवसांनी काढणीस तयार होते. साधारणपणे जर तुम्ही एका एकर क्षेत्रामध्ये या वाणाची लागवड केली तर तुम्हाला 135 ते 150 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.

2- इंद्र इंद्र जातीच्या शिमला मिरचीची लागवड केली तर यापासून देखील तुम्हाला भरघोस सिमला मिरचीचे उत्पादन हाती येऊ शकते. साधारणपणे लागवडीनंतर या जातीची मिरची 70 ते 75 दिवसात काढणीस तयार होते. जर तुम्ही एका एकर क्षेत्रामध्ये इंद्र जातीच्या शिमला मिरचीची लागवड केली तर 100 ते 110 क्विंटल पर्यंत उत्पादन तुम्हाला सहजपणे मिळू शकते.

3- कॅलिफोर्निया वंडर कॅलिफोर्निया वंडर ही शिमला मिरचीची एक प्रसिद्ध आणि भरघोस उत्पादन देणारी जात असून लागवडीनंतर साधारणपणे 70 दिवसांनी काढणीस तयार होते. एका एकर क्षेत्रातून या मिरचीचे 125 ते 150 क्विंटल उत्पादन मिळते. ही शिमला मिरचीची विदेशी जात आहे.

4- ओरोबेल प्रामुख्याने उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश सारख्या थंड प्रदेशात लागवडीसाठी ही जात लागवडीस योग्य आहे. साधारणपणे अशा थंड प्रदेशातील हवामान डोळ्यासमोर ठेवून शास्त्रज्ञांनी ओरोबेल या शिमला मिरचीच्या जातीचा शोध लावला आहे. परंतु त्या व्यतिरिक्त उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील शेतकरी देखील या मिरचीची लागवड करू शकतात.  परंतु जर या राज्यांमध्ये ओरोबेल मिरचीची लागवड करायची असेल तर पॉलिहाऊस मध्येच करणे गरजेचे आहे.ही हिरव्या  रंगाची मिरची असून तिच्यामध्ये उच्च रोगप्रतिकारक शक्ती  आहे.