सोयाबीन उत्पादकांची होणार चांदी ! अर्जेंटिनामध्ये ‘हे’ विपरीत घडलं म्हणून अचानक सोयाबीन दरवाढीच समीकरण बनलं ; नेमका काय आहे माजरा

Soybean Rate India : भारतासमवेतच हवामान बदलाचा विपरीत परिणाम जागतिक पातळीवर देखील आता प्रकर्षाने जाणवू लागला आहे. हवामान बदलामुळे यावर्षी भारतातील खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांना मोठा फटका बसला. यामध्ये सोयाबीनचा देखील समावेश होता.

देशात यावर्षी सोयाबीन उत्पादनात घट झाली आहे. अमेरिकेत देखील यंदा सोयाबीन उत्पादन कमी राहणार आहे. याव्यतिरिक्त आता अर्जेंटिनामध्ये देखील हवामान बदलाचा विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. क्लायमेट चेंज मुळे या ठिकाणी सोयाबीनची पेरणी मोठी कमी झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

खरं पाहता सोयाबीन उत्पादनात ब्राझील शीर्षस्थानावर आहे त्यानंतर अमेरिका आणि त्यानंतर येतो तो अर्जेंटिना. साहजिकच सोयाबीन उत्पादनात या देशाचं मोठं मोलाच स्थान आहे. अमेरिका मध्ये सोयाबीन हंगाम सुरू असून उत्पादनात घट झाली हे आपण पाहिलंच आहे. दरम्यान आता अर्जेंटिनामध्ये उत्पादनात भली मोठी घट होणार असल्याचा अंदाज समोर येत आहे.

अमेरिकेच्या कृषी विभागाने नुकत्याच काही दिवसापूर्वी आपल्या अंदाजपत्रकात अर्जेंटिनामध्ये उत्पादन वाढीचा दावा केला होता. मात्र सध्याची परिस्थिती पाहता त्या देशात परिस्थिती या उलट पाहायला मिळत आहे. सध्या त्या देशात सोयाबीन पेरणी सुरू आहे मात्र काही ठिकाणी दुष्काळ आणि काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा यामुळे सोयाबीन पेरणी वर परिणाम होत आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्या ठिकाणी सोयाबीनची पेरणी कमी झाली आहे. आतापर्यंत अर्जेंटिनामध्ये 37% सोयाबीन पेरणी झाली आहे. आतापर्यंत अर्जेंटिनामध्ये 167 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झालेली आहे. दरम्यान त्या ठिकाणी प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती पाहता उत्पादनावर मोठा विपरीत परिणाम हे ठरलेलाच आहे.

याशिवाय त्यांनी मागील हंगामातील 75 टक्के सोयाबीन हा विक्री करून टाकला आहे. त्यामुळे सोयाबीनचीं उपलब्धता जागतिक पातळीवर कमी राहणार आहे यात तीळ मात्र ही शँका नाही. जागतिक पातळीवर होत असलेल्या या घडामोडीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर वधारत आहेत.

भविष्यात याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीन बाजारावर होणार असून सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता काही तज्ञांकडून वर्तवली जात आहे. आता नेमकी सोयाबीन दरात वाढ किती होईल हा तर एक मोठा अभ्यासात्मक विषय राहणार आहे. मात्र निश्चितच दरात वाढ झाली तर उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.