राजेश शेठ तुम्ही नांदचं केलायं थेट..!! पट्ठ्याने 8 हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होणाऱ्या काळ्या गव्हाची लागवड केली, लाखोंची कमाई झाली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer: भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही केवळ आणि केवळ शेती (Farming) व शेतीशी निगडित व्यवसायावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकरी बांधव (Farmer) शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवत असतात.

विशेष म्हणजे शेतीमध्ये केलेले हे प्रयोग शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याचे ठरतात आणि शेतकरी बांधव या प्रयोगाच्या माध्यमातून शेती व्यवसायातून लाखो रुपये उत्पन्न (Farmer Income) कमावत असतात. अशा परिस्थितीत वर्धा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

मित्रांनो भारतात गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड (Wheat Farming) केली जाते आपल्या राज्यातही गव्हाची शेती विशेष उल्लेखनीय आहे. रब्बी हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या गव्हाची बाजारात कायमच मागणी असते.

आपल्या राज्यात लागवड केल्या जाणाऱ्या गव्हाला दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळतो. मात्र वर्धा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने 8 हजार रुपये प्रति क्‍विंटल दराने विक्री होणाऱ्या काळ्या गव्हाची यशस्वी लागवड (Black Wheat Farming) करून दाखवली आहे.

वर्धा जिल्ह्यात सामान्य गव्हापेक्षा कलर आणि चवीला तसेच बाजार भावात सर्वोत्कृष्ट ठरत असलेला काळा गहू (Black Wheat) मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या मौजे जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी राजेश डफर यांनी काळा गहू उत्पादित करण्याची किमया साधली आहे.

त्यामुळे सध्या राजेश रावांची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे. मित्रांनो कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, काळ्या गव्हाला आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळतो अशा परिस्थितीत राजेशराव यांना काळ्या गव्हाची शेती मालामाल करून सोडणार असल्याचा दावा केला जात आहे.

एका एकरात 17 क्विंटल उत्पादन

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, काळ्या गव्हाची शेती पंजाब आणि हरियाणा राज्यातील शेतकरी बांधव अलीकडे मोठ्या प्रमाणात करत आहेत. मात्र आपल्या राज्यात काळ्या गव्हाची शेती बोटावर मोजण्याइतकेच शेतकरी करत आहेत. वर्धा जिल्ह्यातील तर हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा राजेश राव करत आहेत.

अशा परिस्थितीत वर्धा जिल्ह्यातील मौजे जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी राजेंद्र राव यांचा हा काळ्या गव्हाच्या शेतीचा प्रयोग संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला असून राजेंद्र राव यांच्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. राजेंद्र राव यांनी काळ्या गव्हाची लागवड करण्यासाठी या गव्हाची सर्व माहिती जाणून घेतली.

या गव्हाची शेती कशा पद्धतीने केली जाते याची देखील माहिती जाणून घेतली आणि मग 80 रुपये प्रति किलो या दराने काळ्या गव्हाचे बियाणे खरेदी केले. एका एकरासाठी राजेंद्र राव यांना काळ्या गव्हाचे सुमारे 45 किलो बियाणे लागले. आता राजेंद्र राव यांना या काळ्या गव्हाच्या लागवडीतून सुमारे 17 क्विंटल उत्पादन मिळाले आहे.

निश्चितच बीकॉम पर्यंत शिक्षण घेतलेल्या राजेंद्र रावाचा हा अनोखा प्रयोग वर्धा जिल्ह्यात मोठा कौतुकाचा विषय ठरला आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते सामान्य गव्हापेक्षा काळ्या गव्हामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळतात. त्यामुळे या गव्हाला बाजारपेठेत मोठी मागणी असते.

शिवाय या गव्हाला आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळतो. अशा परिस्थितीत एका एकरात काळ्या गव्हाची शेती करून राजेंद्र राव यांना लाखों रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.