Success Farming Story : पारंपरिक शेतीला फाटा देत संपूर्ण गाव करतंय पानाची शेती! येथील शेतकरी दरवर्षी कमवतात लाखोंचा नफा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Farming Story : शेतीमालामाला भाव मिळत नसल्याने शेती करणे न परवडण्यासारखे झाले आहे. शेतीमधून केलेला खर्च निघत नसल्याने अनेक शेतकरी आजही आत्महत्या करत आहेत. शेती करण्यासाठी खर्च मोठ्या प्रमाणावर येतो मात्र बाजारभार नसल्याने खर्च देखील निघत नाही.

मात्र आता आज असे अनेक शेतकरी पाहायला मिळत आहे जे पारंपरिक शेतीला फाटा देत वेगळ्या आणि आधुनिक प्रकारची शेती करत आहेत. त्यामधून ते लाखोंचा नफा कमावत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे.

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील बेदग गावातील शेतकऱ्याने यशस्वी शेती करून दाखवली आहे. या गावातील शेतकरी नेहमीच नागवेलीच्या सुपारीच्या वेलांची लागवड करतात. येथील शेतकरी यामधून लाखोंचा नफा कमावत आहेत.

या गावातील शेतकरी दरवर्षी नागवेलीच्या सुपारीच्या वेलांची लागवड करतात. भारतामध्ये या झाडाची पाने प्रत्येक पान टपरीवर तुम्हाला पाहायला मिळतील. या पानांना बाजारात मोठी मागणी असल्याने गावातील शेतकऱ्यांना मोठा नफा देखील मिळत आहे.

देशात पानाला मोठी मागणी आहे

भारतामध्ये खायच्या पानाला मोठी मागणी आहे. हे पान मसाला पान, बनारसी पान, कलकत्ता पान म्हणून देशामध्ये प्रसिद्ध आहे. तसेच देशामध्ये हिंदू धर्मात या पानाला धार्मिक महत्व देखील आहे. अनेकजण विविध धार्मिक विधीला या पानाचा वापर करत असतात.

सांगली जिल्ह्यातील बेदग गावातील शेतकऱ्यांना या शेतीचे महत्त्व आधीच पटले होते. त्यामुळे या गावातील बहुतांश शेतकरी नागवेलीच्या सुपारीची लागवड करतात. या पानाच्या शेतीपासून हे शेतकरी दरवर्षी लाखो रुपये नफा कमवत असतात.

हे पान धार्मिक विधी आणि खाण्यासाठीच नाही तर आयुर्वेदिक औषधांसाठी देखील वापरली जातात. त्यामुळे या पानांना प्रचंड मागणी असल्याने त्यामधून चांगला नफा देखील मिळत आहे.

देशभरात पान मार्केट उपलब्ध आहे

देशभरात सर्वत्र पान खाल्ले जाते. त्यामुळे त्याला प्रचंड मागणी आहे. तसेच या पानांसाठी देशभरात कुठेही बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये देखील पान विक्रीसाठी घेऊन जाऊ शकता.

विशेष म्हणजे शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाचा भाव हा व्यापारी ठरवत असतो. मात्र जर तुम्ही खायच्या पानाची शेती केली तर तुम्ही स्वतः तुमच्या मालाचा भाव ठरवू शकता. व्यापारी स्वतः येऊन तुमच्या बागेतील पान खरेदी करतील. बेदग गावामध्ये सध्या शेतकऱ्यांच्या बांधावर व्यापारी जाऊन माल खरेदी करत आहेत.

पानाची तोडणी करण्यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता आहे. कारण पानाची तोडणी योग्य प्रकारे झाली तर त्याला जास्त भाव मिळत अन्यथा पण खराब झाल्यानंतर त्याला बाजारात भाव मिळणार नाही.

बेदग गावातील शेतकऱ्यांनी आता ताडीच्या झाडाची देखील लागवड करण्यास सुरुवात केली आहे. ताकरी-महिसाळ सिंचन योजनेचे पाणी आल्याने शेतकरी अनेक वेगवेगळ्या प्रकारची शेती करत आहेत.

पानाची शेती करताना शेतकऱ्यांना अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागते. उष्णतेने पाने तुटू नयेत किंवा ती पिवळी पडू नयेत यासाठी शेतकरी या शेतीमध्ये ताडीची झाडे लावत आहेत. जेणेकरून त्या शेतीमध्ये झाडांची सावली पडेल.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दरवर्षी वाढत आहे

शेतकरी पानाच्या शेतीमध्ये शेवग्याच्या झाडांची देखील शेती करत आहेत. आंतरपीक म्हणून आणि उन्हापासून पानांचा बचाव होण्यासाठी या हा पर्याय वापरला जात आहे. मात्र पाने परिपक्व होईपर्यंत येथील शेतकरी शेवग्याच्या शेंगापासून उत्पन्न मिळवत असतात. शेतकऱ्यांना या शेतीमधून दुप्पट उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांना ही शेती फायदेशीर ठरत आहे. शेतकरी या शेतीपासून दरवर्षी लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत.