Success Story : भावा चर्चा तर होणारच…! गव्हाच्या शेतीत कर्जबाजारी झाला पण काकडीच्या शेतीतून 4 महिन्यात 18 लाखांचा धनी बनला

Ajay Patil
Published:
success story

Success Story : भारतासारख्या शेतीप्रधान देशात अजूनही पारंपारिक पद्धतीने शेती (Farming) केली जात आहे. मात्र असे असले तरी पारंपरिक शेतीत होत असलेले नुकसान पाहता आता शेतीमध्ये प्रगत शेती तंत्राचा वापर वाढत आहे. देशात प्रगत शेती तंत्रांचा वापर वाढला आहे म्हणून आता शेतीतून शेतकरी बांधवांना (Farmer) अधिक नफा (Farmer Income) मिळत आहे.

शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतकरी बांधवांना शेती करणे अनेक पटींनी सोपे झाले आहे. एकंदरीत काय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने आता देशातील शेतकरी समृद्ध होत आहेत. विशेष म्हणजे आता देशातील तरूण शेतकऱ्यांशिवाय, शतकानुशतके पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचाही शेतीच्या या आधुनिक तंत्रज्ञानावर विश्वास बसू लागला आहे.

आपल्या राज्यातील शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणात आधुनिक शेती तंत्राचा वापर करून आपले उत्पन्न दुपटीने वाढवत आहेत. शिवाय राजस्थानचे शेतकरी देखील आता आधुनिक शेती तंत्राचा अवलंब करून शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करून यशाची नवनवीन गिरीशिखरे सर करत आहेत. असेच एक उदाहरण समोर आलं आहे ते राजस्थान राज्यातील दौसा जिल्ह्यातुन.

दौसा जिल्ह्यातील मौजे खवरावजी येथील दोन प्रयोगशील शेतकरी बाबुलाल शर्मा आणि विनेश जैमन यांनी देखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती व्यवसायात दैदिप्यमान कामगिरी करून दाखवली आहे. या दोन्ही प्रयोगशील शेतकऱ्यांनी पॉलीहाऊसमध्ये (Polyhouse Farming) काकडीची शेती (Cucumber Farming) करून पारंपारिक पिकांपेक्षा अधिक नफा मिळवण्याची किमया साधली आहे. त्यामुळे सध्या हे दोन्ही शेतकरी संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनले आहेत. विशेष म्हणजे आज संपूर्ण गाव बाबूलाल शर्मा यांच्या या प्रयत्नांचे कौतुक करताना थकत नसल्याचे चित्र आहे.

बाबूलाल शर्मा यांनी शेतीमध्ये केलेल्या या कामगिरीची भुरळ खुद्द जिल्हाधिकाऱ्यांना देखील पडली आहे. हेच कारण आहे की, दौसाचे जिल्हाधिकारी कमर-उल-जमान चौधरी स्वतः बाबूलाल शर्मा यांच्या आधुनिक शेतीचे निरीक्षण करून त्यांचे कौतुक केले आहे. स्वतः कलेक्टर प्रयोगशील शेतकऱ्याने केलेल्या प्रयोगाचे निरीक्षण करण्यासाठी बांधावर येत असल्याने या शेतकऱ्याचा (Successful Farmer) सर्वत्र गाजावाजा होत आहे.

गहूच्या शेतीमुळे झाला कर्जबाजारी

बाबुलाल शर्मा आणि विनेश जैमन हे शेतकरी पॉलिहाऊसमध्ये काकडी वाढण्यापूर्वी अनेक वर्षांपासून देशातील इतर शेतकऱ्यांप्रमाणेच बाजरी आणि गव्हाची पारंपरिक शेती करत होते. या पारंपारिक पीक पद्धतीत या दोघांना मोठी मेहनत घ्यावी लागत असे आणि मिळणारे उत्पन्न देखील खूपच कमी होते. यामुळे हे दोघे प्रयोगशील शेतकरी कर्जबाजारी झाले. त्यामुळे दोन्ही शेतकरी आधुनिक शेती तंत्राकडे वळले आणि पॉलिहाऊसमध्ये काकडीची व्यावसायिक लागवड सुरू केली. आज काकडीच्या शेतीतून या दोघांना चांगली कमाई होत असून त्यांनी कर्जाची वसुली देखील आता केली आहे.

शेततळ्यामुळे सहज सिंचन झाले

बाबुलाल शर्मा आणि विनेश जैमन या शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक स्मार्ट फील्ड बनवले आहे, ज्यामध्ये पॉलीहाऊस तसेच सिंचनासाठी शेततळे आहे. या तलावात पॉलीहाऊसच्या छतावरून व आजूबाजूच्या शेतात पावसाचे पाणी जमा होत असल्याने भूजल पातळी राखून सिंचनाच्या पाण्याची मोठी बचत होत आहे. पॉलीहाऊसमध्ये ठिबक सिंचन पद्धतीने सिंचनाचे कामही केले जाते, त्यामुळे पाण्याचा थेंब थेंब योग्य वापर होत आहे. शेतकऱ्यांच्या या स्मार्ट फील्डमध्ये तीन शेततळी आहेत, त्यापैकी दोन तलाव प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत बांधण्यात आले आहेत. या तिन्ही तलावांमध्ये 40 लाख लिटरपर्यंत पावसाचे पाणी जमा होऊ शकते.

4 महिन्यांत 18 लाख कमवले बर…!

या दोन्ही प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मते, गतवर्षी या तंत्राच्या मदतीने काकडी पिकाची लागवड करून चांगले उत्पादन घेतले होते, त्याची विक्री करून 4 महिन्यांत 18 लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. सध्या दोन्ही शेतकऱ्यांनी पॉलिहाऊसमध्ये पुन्हा काकडीचे नवीन पीक लावले असून, त्यातून सरासरी 35 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. निश्चितच शेतीमधला हा बदल या शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरला असून यामुळे इतर शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe