Success Story : या फुलाच्या लागवडीतून शेतकरी महिन्याला कमावतो लाख ते सव्वा लाख, अशापद्धतीने केले नियोजन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story ; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आता नैसर्गिक आपत्तीला तोंड देत असताना आणि हवामान बदलाला अनुसरून शेती पद्धतीत आणि पीक लागवडीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत. तसेच अशा पद्धतीचे पिक बदल करताना मागणीच्या दृष्टिकोनातून देखील शेतकरी विचार करत असल्याचे सध्या दिसून येते व त्याच पद्धतीने पिकांची निवड देखील लागवडीकरिता करण्यात येते.

गेल्या काही वर्षांचा विचार केला तर शेतीमध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे प्रयोग सातत्याने शेतकरी करत असून त्याचाच एक भाग म्हणून वेगवेगळ्या पिकांची लागवड देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अशा पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक नफा मिळताना देखील दिसून येतो. त्याच अनुषंगाने जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर कायमच दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जाणारा आणि आता मागील एक ते दोन वर्षापासून अतिवृष्टी आणि विविध नैसर्गिक आपत्तींना सातत्याने तोंड देत असलेला पट्टा म्हणून ओळखला जातो.

परंतु या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी देखील आता हवामान बदलाला अनुसरून पिक पद्धतीत बदल केलेला आहे. त्यामुळे विविध पिकांच्या लागवडीचे प्रयोग करून शेतकरी चांगले आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत. अगदी त्याच पद्धतीने जर आपण औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वडजी गावच्या शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्याने गुलाब फुलशेतीतून महिन्यासाठी लाखो रुपये कमविले आहेत. या शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 गुलाब शेतीतून लाखोंचे उत्पन्न

याबद्दलचे सविस्तर वृत्त असे की, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वडजी या गावचे बाबासाहेब गोदरे यांनी गुलाब शेतीतून लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवण्याची किमया साधली आहे. त्यांच्याकडे एकूण बारा एकर शेती असून  यामध्ये सहा एकर वर डाळिंब आणि दोन एकर वर मोसंबी या फळबागांची लागवड केली असून उरलेल्या चार एकर क्षेत्रावर त्यांनी गुलाब आणि निशिगंध या फुलांची लागवड केली आहे.

गेल्या दोन वर्षापासून ते गुलाब शेती करत असून त्यांना प्रत्येक महिन्याला एक लाख ते सव्वा लाख रुपयांचा नफा या माध्यमातून मिळत आहे. साधारणपणे गुलाबाचा विचार केला तर यापासून नऊ महिने फुलांचे उत्पादन मिळते. परंतु ऑगस्ट ते मार्चच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत यामध्ये सातत्याने फुलांचे उत्पादन मिळते.

परंतु मार्चनंतर उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे  याचा विपरीत परिणाम हा फुलांच्या उत्पादनावर देखील होतो. परंतु उन्हाळ्याचे दिवस सोडले तर सप्टेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांच्या कालावधीमध्ये फुलांचे उत्पादन मिळते व सातत्याने तोडणी करावी लागते. या आधी बाबासाहेब गोदरे हे शेतीमध्ये पारंपारिक अशा ज्वारी आणि सोयाबीन या पिकांची लागवड करत होते.

परंतु बऱ्याचदा या मधून केलेल्या खर्च देखील निघणे मुश्किलीचे होते. त्यामुळे त्यांनी या पिकांचा नाद सोडून फूल शेतीकडे वळण्याचे ठरवले व गुलाब लागवड केली. याच गुलाब विक्रीतून त्यांना आता लाख ते सव्वा लाख रुपये प्रति महिना आर्थिक उत्पन्न मिळत आहे.