ये हुई ना बात ! 5 गुंठ्यात खेकडा पालणाचा केला प्रयोग, लाखोंच्या कमाईचा खुला झाला मार्ग

Successful Crab Farming : अलीकडे भारतीय शेतीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. पारंपारिक शेतीमध्ये अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळत असल्याने आता शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती कसण्यास सुरुवात केली आहे. आधुनिक पद्धतीने शेती करतानाच शेतकऱ्यांनी आता शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्यास सुरुवात केली आहे.

यामध्ये खेकडा पालनासारखा शेतीपूरक व्यवसाय देखील मोठ्या झपाट्याने शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या मौजे कहांडळवाडी येथील एका प्रयोगशील तरुण शेतकऱ्याने देखील पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने खेकडा पालनातून लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दत्तात्रय चांगदेव नाठे असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव. या गावातील शेती ही सर्वस्वी पावसावर आधारित आहे. यामुळे शेतीतून मिळणार उत्पन्न हे खूपच तोकडं. यामुळे या प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या पाच गुंठे वडिलोपार्जित शेत जमिनीत एक तलाव तयार करून खेकडा पालन सुरू केले.

यामध्ये दहा टन खेकड्यांचे पालन होऊ शकते. सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याला खेकडा पालनातून उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली असून चारशे रुपये प्रति किलो जागेवरच दर मिळत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की नाठे यांचा पुण्यात पॅथॉलॉजिकल लॅबचा व्यवसाय आहे. या व्यवसायाबरोबरच ते आपल्या गावाकडे सालदार लावून शेती करतात. मात्र शेतीमधून फारस असं उत्पन्न त्यांना मिळत नव्हतं.

परिणामी त्यांनी पुण्याच्या आपल्या मित्रांच्या अनुभवाने गेल्या वर्षापासून खेकडा पालन करण्यास सुरुवात केली. यासाठी आपल्या गावी असलेल्या वडिलोपार्जित पाच गुंठे शेत जमिनीत दहा फूट खोलीचा सिमेंट काँक्रेटचा भूमिगत हौद बांधण्यात आला. यामध्ये मातीचा मलबा दगड मुरूम इत्यादी भरून घेण्यात आले.

खेकडा पालनात पाण्यापेक्षा चिखल महत्त्वाचा असल्याने अशी व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले गेले. हौदाला चारही बाजूंनी लोखंडी तारेचे कुंपण आणि वरून शेडनेटची जाळी मारण्यात आली. साधारण एक महिन्यापासून या खेकड्याचे उत्पादन त्यांना मिळत आहे. यामध्ये 200 ते 250 ग्रॅम चे खेकडे विक्री केले जात आहेत.

एका दिवसाआड शिर्डी येथील एका हॉटेलची 50 किलो ची ऑर्डर आहे तसेच दिवसाकाठी चार ते पाच किलो जागेवरच खेकडे विक्री होत आहेत. त्यांना चारशे रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. नाठे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी यासाठी आवश्यक असलेले बीज रत्नागिरी मधून सहाशे रुपये प्रति किलो दराने मागवले.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

खेकडा पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी नाठे यांना साडेसात लाख रुपये खर्च आला यामध्ये तीन लाख रुपये अनुदान मिळाले आहे. त्यांना या व्यवसायातून आगामी सहा महिन्यात भांडवलसाठी लागलेला सर्व खर्च वसूल होण्याची आशा आहे. निश्चितच काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल केला तर शेती तोट्याची नाही तर फायद्याची ठरते. श्रीमान दत्तात्रेय यांनी हे प्रूव्ह केलं असून त्यांच्या या प्रयोगातून इतरांना देखील प्रेरणा मिळणार आहे.