बाळासाहेबांचा शेतीमध्ये भन्नाट प्रयोग ! 2 एकर पेरूच्या बागेतून मिळवले 12 लाखांचे उत्पन्न ; पंचक्रोशीत रंगली चर्चा

Successful Farmer : शेतकरी बांधवांना शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय डबघाईला आली आहे. यामुळे आता नवयुवक शेतकरी पुत्र शेतीपासून दूर होत असल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी महाराष्ट्रात असेही अनेक शेतकरी आहेत जे आपल्या कर्तुत्वाच्या आणि योग्य नियोजनाच्या जोरावर शेतीमधून लाखोंची कमाई करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहेत.

आज आपण अशाच एका अवलियाची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी फळ शेतीच्या माध्यमातून चांगली कमाई केली आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्याचे मौजे दिग्रस बरसाले येथील बाळासाहेब दगडोबा बरसाले पारंपारिक शेतीला फाटा देत फळबाग शेती सुरू केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यासाठी त्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले आहे. बाळासाहेब यांनी आपल्या दोन एकर शेत जमिनीत व्हीएनआर पेरूची 500 झाडे लावली आहेत. तीन एकरात मोसंबीची 400 झाडे लावण्यात आली आहेत. याशिवाय त्यांनी लिंबूची शंभर झाडे लावली आहेत. त्यांच्याकडे एकूण 12 एकर शेत जमीन असून ते कायमच शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग होत असतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

याच प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी पारंपारिक पीक पद्धतीला बगल देत फळबाग शेतीला सुरुवात केली असून यातून त्यांना चांगली कमाई होत आहे. बरसाले यांना पेरूची बाग विशेष फायदेशीर ठरली आहे. गेल्या वर्षी त्यांनी आपला पेरू चाळीस रुपये प्रति किलो दराने विक्री केला. तीन एकरातून त्यांना 30 टन उत्पादन मिळाले म्हणजेच जवळपास 12 लाखांच उत्पन्न प्राप्त झाले.

बाळासाहेबांच्या मते फळांची वर्गवारी करून, प्रतवारी करून आणि पॅकिंग करून विक्री केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळतो. मोसंबीच्या पिकातूनही त्यांना चांगली कमाई झाली असून जवळपास चार लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. मोसंबीचं त्यांना 15 टन उत्पादन मिळालं आणि 25 रुपये प्रति किलोचा दर मिळाला. या पद्धतीने त्यांना यातून चार लाख मिळाले.

एकंदरीत फळबाग लागवडीतून बाळासाहेब यांनी लाखो रुपये कमवण्याची किमया साधली आहे. त्यांचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार असून शेतकरी बांधवांनी पारंपारिक पिकांऐवजी जर फळबाग लागवडीकडे आपला मोर्चा वळवला तर निश्चितच त्यांना यातून चांगली कमाई होण्याची शक्यता आहे.