वावर हाय तो पॉवर हाय..! पट्ठ्याने बँक मॅनेजरच्या नोकरीला ठोकला राम-राम…!! सुरु केली शेती, सोबतीला बायको पण आली, लाखोंची कमाई झाली 

Successful Farmer: गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये (Farming) सातत्याने शेतकरी बांधवांना (Farmer) नुकसान सहन करावे लागत असल्याने नवयुवक शेतकरी पुत्र आता शेतीपासून दुरावत चालला आहे. शेतकरी बांधव सुद्धा आता शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत.

शेतकरी पुत्र आता शेती करण्यापेक्षा नोकरीला अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात नोकरी चांगली असेल तर शेतीचा विचार कोण करू शकतो. मात्र, झारखंड राज्यातील एका तरुणाने नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

विशेष म्हणजे तरूणाने आता शेतीमधून लाखो रुपये उत्पन्न (Farmer Income) कमावण्याची किमया साधली आहे. यामुळे सध्या पंचक्रोशीत या भावड्याची मोठी चर्चा रंगली आहे. मित्रांनो कोरोनाच्या काळात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे विनोद कुमार हे सुमारे दीड वर्षापासून पुण्यातील एचडीएफसी बँक व्यवस्थापक आणि पत्नी राधिका बहुराष्ट्रीय कंपनीची नोकरी सोडून हजारीबाग जिल्ह्यातील गिड्डी येथील राबोध गावातील ओसाड जमिनीत शेती (Agriculture) करत आहेत.

दोघेही शेतीत आनंदी असून यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यांनी उत्पादित केलेले अनेक टन टरबूजही यावर्षी बांगलादेशला पाठवण्यात आले आहेत. त्यात सुधारणा करण्याच्या हेतूने ते अनेक प्रकारचे विचार करत आहेत. या दोघा नवरा बायकोच्या यशामुळे नवयुवकांना शेती कसण्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

18 एकर नापीक जमीन भाडेतत्त्वावर घेतली

हजारीबाग जिल्ह्यातील चर्चू ब्लॉकमधील हरहड गावातील रहिवासी विनोद कुमार आणि राधिका पुण्याहून गावात पोहोचले तेव्हा त्यांना शेतीबद्दल काहीच माहिती नव्हती.  दोघांनीही शेती करण्याचा बेत आखला. सर्वप्रथम दोघांनी अनेक ठिकाणी भेटी देऊन शेतीची माहिती मिळवली.

हरड गावात जमीन नव्हती. त्यानंतर दोघांनी राबोध गावातील दारवा आणि कुसुमडीह येथे 18 एकर नापीक जमीन 10 वर्षांसाठी भाड्यावर घेतली. 2021 मध्ये 150 टन आणि 2022 मध्ये 210 टन टरबूजचे उत्पादन घेतले. यासाठी त्यांनी ठिबक सिंचन प्रणालीचा यशस्वी वापर केला यामुळे पाण्याची बचत झाली.

टरबुजाबरोबरच भाजीपाल्याचेही लागवड

विनोद कुमार डाडी हे संयुक्त ग्रामीण प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे ​​सीईओ आहेत. विनोद कुमार यांनी शेतकरी उत्पादक संघटना (FPO) मार्फत पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि बांगलादेशमध्ये टरबूज विकले आहे.

सध्या त्यांच्या शेतात काकडी, कारली या पिकांची लागवड केली आहे. धनबाद, बोकारो, आसनसोल येथेही त्याची विक्री होत आहे. काकडी 150 क्विंटल, कारली 100 क्विंटलचे उत्पादन अपेक्षित असल्याचे विनोद कुमार यांनी सांगितले.  यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.