Successful Farmer: मानलं लेका…! ड्रॅगन फ्रुटची शेती सुरु केली अन लाखोंची कमाई झाली, पुरस्कार पण मिळाला; वाचा ही यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer: मित्रांनो भारतातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात मोठा बदल करत आहेत. उत्तर प्रदेश राज्यातील बिजनौरमधील एका तरुण शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये नावीन्यपूर्ण बदल केला आहे.

या अवलिया शेतकऱ्याने तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णतेच्या मदतीने लाखों रुपये उत्पन्न (Farmers Income) कमावण्याची किमया साधली आहे. बिजनौरमधील शेतकरी ऋतुराजने आपल्या योग्य नियोजनाच्या तसेच अपार कष्टाच्या जोरावर शेतीला (Farming) फायदेशीर व्यवहार बनवून दाखवला आहे. ड्रॅगन फ्रूटची शेती (Dragon Fruit Farming) करून त्यांनी जिल्ह्यात आपल्या नावाचा एक नवीन ठसा उमटवला असून उत्पन्नातही वाढ केली आहे.

त्याने उत्पादीत केलेले ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) तो स्थानिक बाजारपेठेच्या माध्यमातून इतर शहरात आणि राज्यांना पुरवत आहे. या शेतकऱ्याने शेतीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल डीएम यांनी या शेतकऱ्याचा गौरव देखील केला आहे. नाहटौर विकास गटातील उमरी गावातील रहिवासी शेतकरी राजेंद्र सिंग यांचा मुलगा ऋतुराज ड्रॅगन फळाचे उत्पादन घेत आहेत.

त्यांनी एक एकरात सेंद्रिय ड्रॅगन फळाची लागवड केली आहे. त्यांची उत्पादने स्थानिक बाजारपेठेत विकली जातात. चांगला भाव मिळावा म्हणून ते इतर राज्यांतही याचा पुरवठा करतात. बाजारात ड्रॅगन फ्रूटला चांगली मागणी आहे. स्थानिक बाजारपेठेत ते 200 रुपये किलो दराने विकले जाते. त्यांच्याकडे 380 ड्रॅगन फ्रूट पोल आहेत, एका खांबावर चार झाडे आहेत.

त्यांच्या मते, प्रति पोल उत्पादन दरवर्षी 25 ते 30 किलोपर्यंत येते. गतवर्षी त्यांनी 308 पोलांमधून एक क्विंटल फळ घेतले होते. त्याचे वडील राजेंद्र सिंह हे देखील त्याला ड्रॅगन फ्रूट लागवडीत मदत करत आहेत.

कल्पकतेने फळांची लागवड करणाऱ्या ऋतुराज या शेतकऱ्याचा जिल्हाधिकारी उमेश मिश्रा यांनी पुरस्कार देऊन गौरव केला. निश्चितचं ही ऋतूराज यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे. शिवाय ऋतूराज यांचे हे कार्य इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणार आहे.

सेंद्रिय शेतीचे लक्ष्य
सेंद्रिय शेती हे आपल्या जीवनाचे ध्येय असल्याचे शेतकरी ऋतुराज यांनी सांगितले. ते त्यांच्या शेतात गूळ, साखर, मोहरीचे तेल, उडीद, मूग, बासमती तांदूळ, शरबती तांदूळ, काळा गहू, हळद इत्यादी सेंद्रिय उत्पादन घेत आहेत. त्यांनी ऑरगॅनिक ऑर्चर्ड एलएलपी कंपनी स्थापन केली. ते त्यांची उत्पादने पॅकिंग करतात आणि विकतात.