Successful Women Farmer : मराठी पाऊल पडते पुढे ! महिला शेतकऱ्याचे युट्युबवर धडे ; कमावते महिन्याकाठी ‘इतके’

Successful Women Farmer : मराठमोळे शेतकरी शेतीमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधत आहेत. शेतकरी बंधू भगिनी आता केवळ शेतीतचं सक्रिय आहेत असे नाही तर बदलत्या काळात आता शेतकऱ्यांनी देखील स्वतःला बदललं आहे.

आता जवळपास सर्वच क्षेत्रात नवयुवक शेतकऱ्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. मग ते क्षेत्र सोशल मीडियाचे का असेना. सोशल मीडियामध्ये देखील तरुण शेतकरी वर्गाचा जलवा कायम आहे. युट्युब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता हजारो शेतकरी सक्रिय असून युट्युब स्टारची उपाधी त्यांनी मिळवली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

खरं पाहता आज राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त आपण देखील अशा एका मराठमोळ्या महिला शेतकऱ्याच्या यशाचा जागर करणार आहोत ज्यांनी शेतीसोबतचं youtube या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या कौशल्याच्या माध्यमातून युट्युबस्टार बनण्याचा तमगा प्राप्त केला आहे.

मनीषा वंजारी असं या महिला शेतकऱ्याचे नाव असून त्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील इच्छापुर या गावी वास्तव्यास आहेत. युट्युबवर सक्रिय होण्यापूर्वी त्या इतर शेतकऱ्यांप्रमाणेच शेतीतील कामे करत. मात्र त्यांचे बंधू ओम सावळे हे एक प्रसिद्ध youtube स्टार आहेत.

त्यांना युट्युबचे व्हिडिओ बनवण्याची एक चांगली कसब आहे. ते युट्युब वर नावाजलेले टेक युट्युबर आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या बहिणीला म्हणजेच मनीषा वंजारी यांना युट्युबवर व्हिडिओ बनवण्याची कल्पना सुचवली. आपला भाऊ याच क्षेत्रात आहे मग आपणही विडिओ बनवून पाहूया म्हणून त्यांनी युट्युबवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.

खरं पाहता सुरुवातीला मनीषा यांच्या मुलीच्या नावाने युट्युब वर एक अकाउंट ओपन झालं. यामध्ये मनीषा पण दिसायच्या. लोकांना ते व्हिडिओ आवडले. यामुळे मग त्यांनी स्वतःच्या नावाने एक अकाउंट ओपन केलं. आणि पाहता पाहता त्या पण एक प्रसिद्ध youtube स्टार बनल्या. आजच्या घडीला त्यांच्या चैनलवर 37K अर्थातच 37 हजार सबस्क्रायबर आहेत.

मनीषा यांच्या मते, शेती हे एक जोखीमपूर्ण क्षेत्र असून कधी चांगले पिकते तर कधी पिकत नाही. मात्र असे असले तरी त्यांनी शेती कसणे सोडले नाही. आता त्यांना युट्युब वरून 25 ते 30 हजार रुपये मंथली भेटतात तरीदेखील त्या मोठ्या हिरीरीने शेतीमध्ये काम करतात. निश्चितच, ज्या समाजात पूर्वी मुलींना शिक्षण घेणेदेखील शक्य नव्हते त्या समाजात आजच्या घडीला महिलावर्ग आपल्या स्वबळावर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत.

आता सोशल मीडियामध्ये देखील महिलावर्ग मागे राहिलेला नाही. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिला देखील आता सोशल मीडिया स्टार बनून आपले समाजात एक वेगळे स्थान बनवू पाहत आहेत याचंच एक उत्तम उदाहरण आहेत मनीषा वंजारी.