Sugarcane Farming : पूर्वहंगामी ऊस लागवड करायचा बेत हाय ना! मग उसाच्या या जातीची लागवड करा, बक्कळ कमाई होणारं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugarcane Farming : भारतात उसाला (Sugarcane Crop) नगदी पिकाचा (Cash Crop) दर्जा देण्यात आला आहे. उसाची लागवड (Cultivation Of Sugarcane) संपूर्ण भारत वर्षात केली जाते. आपल्या राज्यातील ऊस लागवडीखालील क्षेत्र देखील विशेष उल्लेखनीय आहे.

मित्रांनो महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात उसाची शेती (Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्या राज्यात एकूण तीन हंगामात ऊस लागवड केली जाते. सुरु हंगाम, पूर्वहंगाम तसेच आडसाली हंगाम अशा तिन्ही हंगामात आपल्या महाराष्ट्रात उसाची लागवड केली जात असते.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सुरु हंगामातील लागवड 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी दरम्यान केली जात असते. पूर्व हंगामातील ऊस 15 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान लागवड केली जाते. आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान केली जाते. अर्थातच पुढील महिन्यापासून राज्यातील अनेक शेतकरी बांधव पूर्व हंगामातील उसाची शेती करणार आहेत.

अशा परिस्थितीत उत्पादक शेतकरी बांधवांना (Farmer) काही बाबींची काळजी घेण्याचे देखील आव्हानं जाणकार लोकांकडून केले जात आहे. मित्रांनो जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी उसाच्या सुधारित वाणांचीचं (Sugarcane Variety) लागवड केली पाहिजे जेणेकरून त्यांना ऊस हे नगदी पिकातून चांगला बक्कळ पैसा मिळू शकेल.

जाणकार लोक सांगतात की सुधारित जातीच्या उसाची लागवड (Improved Variety Of Sugarcane) केल्यास शेतकरी बांधवांचा उत्पादन खर्च देखील बचत होते यामुळे मजेदार उत्पादन मिळते तसेच साखरेचा उतारा देखील अव्वल दर्जाचा मिळतो. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी नेहमी उसाच्या सुधारित जातींची निवड करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आज आपण देखील पूर्व हंगाम लागवडीसाठी कोणत्या सुधारित जातींची शेतकरी बांधवांनी निवड केली पाहिजे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया पूर्व हंगामात लावल्या जाणार्‍या काही उसाच्या प्रमुख जाती.

उसाच्या पूर्व हंगामी जाती खालीलप्रमाणे:-

को.740 :- या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही जात सुरू, आडसाली तसेच पूर्व हंगाम या तिन्ही हंगामांत लागवडीसाठी योग्य आहे. या जातीची अजून एक मोठी विशेषता म्हणजे ही जात पाण्याचा ताण सहन करण्यास सक्षम असते.

को.7219 (संजीवनी) :- संजीवनी उसाची लागवड सुरू तसेच पूर्व हंगामात केली जाते. उसाची ही जात पूर्व हंगामात लागवड केल्यास 131 मेट्रिक टन हेक्‍टर उत्पादन यापासून मिळू शकते.

को. एम. 88121(कृष्णा)/ को.एम.7714 :- या उसाची लागवड तिने हंगामात केली जाते. सुरु हंगाम, पूर्व हंगाम तसेच आडसाली हंगामात या उसाची लागवड केली जाते. पूर्वा हंगामात या उसाच्या जाती पासून 130 मेट्रिक टन हेक्‍टरी उत्पादन घेता येते. या उसाच्या दोन विशेषता एक तर पाण्याचा ताण सहन करते आणि दुसरे म्हणजे खोडवा मध्ये देखील दर्जेदार उत्पादन मिळते.

को. 8014 (महालक्ष्मी) :- या उसाची सुरु तसेच पूर्व हंगामात लागवड केली जाते. या जातीचा ऊस पूर्व हंगामात अधिक उत्पादन देतो. या जातीच्या ऊसापासून पूर्व हंगामात 135 मेट्रिक टन उसाचे उत्पादन घेतले जाऊ शकते. शिवाय या जातीचा ऊस गुळासाठी सर्वात बेस्ट असल्याचा दावा केला जातो.

को.सी 671:- या जातीच्या उसाची सुरू आणि पूर्व हंगामात लागवड शक्‍य असते. पूर्वा हंगामात या जातीचा ऊस 111 मेट्रिक टन हेक्‍टरी उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जात आहे. साखरेच्या उताऱ्यासाठी ही जात चांगली असते.

को.86032 (नीरा):- या जातीचा ऊस तिन्ही हंगामात लागवड करता येतो. पूर्वा हंगामात लागवड केल्यास 139 मेट्रिक टन हेक्‍टरपर्यंत उत्पादन घेता येते. खोडवा उत्पादनासाठी देखील या जातीचा ऊस चांगला असल्याचे जाणकार सांगतात.

को.94012(फुले सावित्री) :- या जातीच्या उसाची सुरू आणि पूर्व हंगामात लागवड केली जाते. पूर्वा हंगामात लागवड केल्यास 139 मेट्रिक टनापर्यंत उत्पादन मिळते. तसेच या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे साखरेचा उताराही चांगला मिळतो.

को. एम 0265 (फुले 265) :- सुरू, पूर्वहंगाम व आडसाली या तीन हंगामांत या जातीच्या उसाची लागवड केली जाते. ही जात पूर्व हंगामात 164 मेट्रिक टन हेक्टर पर्यंत उत्पादन देण्यास सक्षम आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या जातीपासून अधिक उत्पादकता मिळवता येते शिवाय क्षारपड जमिनीतही या जातीचा ऊस चांगले उत्पादन देत असल्याचा दावा केला जातो.

को. व्ही. एस. आय 9805 :- या जातीच्या उसाची तीनही हंगामात लागवड केली जात असून पूर्व हंगामात लागवड केल्यास 139 मेट्रिक टन हेक्‍टरपर्यंत उत्पादन मिळते. साखर उताऱ्यासाठी ही जात सर्वाधिक चांगली असल्याचा दावा केला जातो.

को. व्ही. एस. आय 434  :- सुरु तसेच पूर्व हंगामात ऊस लागवड करायची असल्यास या जातीचा शेतकरी बांधव विचार करू शकतात. पूर्व हंगामात 130 मेट्रिक टन उत्पादन देण्यास ही जात सक्षम आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे लवकर परिपक्व होते तसेच साखर उतारा देखील चांगला आहे.