Sugarcane Farming : याला म्हणावं नादखुळा ! ऊस उत्पादक शेतकऱ्याने घेतले एकरी 140 मेट्रिक टन उत्पादन, असं केलं नियोजन

Sugarcane Farming : महाराष्ट्र ऊसाच्या उत्पादनासाठी संपूर्ण भारत वर्षात ओळखला जातो. गेल्या वर्षी साखर उत्पादनात महाराष्ट्राने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. याच सर्व श्रेय राज्यातील ऊस उत्पादकांना जात. सध्या उसाचा गळीत हंगाम प्रगतीपथावर आहे. या हंगामात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

प्रयोगशील शेतकरी बांधवांनी उसाचे विक्रमी उत्पादन घेत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या रेठरे हरणाक्ष येथील प्रयोगशील ऊस उत्पादक शेतकऱ्याने देखील एकरी 140 मेट्रिक टन उत्पादन घेऊन सर्वत्र कौतुक मिळवल आहे.

संकेत जयकर मोरे असे या प्रयोगशील शेतकऱ्यांचे नाव असून ते यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने घेण्यात आलेल्या जयवंत आदर्श कृषी योजनेत सहभागी आहेत.

Advertisement

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत आदर्श कृषी योजना सुरू झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून ऊस उत्पादकांचे टनीज म्हणजेच उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून उत्पादक शेतकरी बांधवांना मार्गदर्शन मिळाले आहे.

संकेत यांनी देखील या योजनेत भाग नोंदवला होता. यामुळे त्यांना वेळोवेळी ऊस उत्पादन कशा पद्धतीने वाढवले जाऊ शकते यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन लाभल आहे. या व्यतिरिक्त ऊस उत्पादकांना कारखान्या मार्फत माफक दरात जिवाणू खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, कंपोस्ट खते पुरविली गेली आहेत.

यामुळे उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी उत्पादकांना मोठी मदत झाली आहे. तसेच उत्पादन खर्चात बचत झाली आहे. संकेत यांनी देखील या योजनेत भाग घेतला असल्याने त्यांना माफक दरात खतांचा पुरवठा झाला आहे. त्यांनी ठिबक सिंचन प्रणालीचा यशस्वी वापर करून विद्राव्य खतांचे व्यवस्थापन केले आहे तसेच पाणी व्यवस्थापन करण्यासाठी देखील या ठिबक सिंचन प्रणालीचा त्यांना फायदा झाला आहे.

Advertisement

एकंदरीत कारखान्याच्या या योजनेचा या प्रयोगशील शेतकऱ्याला फायदा झाला असून त्यांनी विक्रमी उत्पादन घेत इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे.